उद्धव ठाकरेंना शाखांवर फिरावे लागते, हे सर्वात वाईट! गुलाबराव पाटलांचा घणाघात

104

आदित्य ठाकरे आज महाराष्ट्रात दौरे करत आहेत, असेच दौरे त्यांनी पूर्वी केले असते, तर आज आलेले दिवस त्यांच्यावर आले नसते. आमचे हेच म्हणणे होते, उद्धव ठाकरेंची तब्येत खराब होती, पण आपण ३० वर्षांचे तरुण होतात. जर आपण राज्यभर शिवसेनेसाठी दौरा केला असता तर आपल्यावर आज आलेली वेळ आली नसती. आज उद्धव ठाकरे यांना शाखेवर जावे लागते,  ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. आज त्यांना विनामास्क शाखेवर जावे लागते, ही वाईट परिस्थिती आहे, अशा शब्दांत आमदार गुलाबराव पाटील यांनी टीका केली.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा नाशिकच्या मनमाड येथे पोहोचली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, अशा घणाघाती टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर केली. या पार्श्वभूमीवर जळगावातील पत्रकारांनी गुलाबराव पाटलांना प्रश्न विचारले. यावेळी गुलाबराव पाटलांनी ठाकरे बापलेकांवर टीका केली.

(हेही वाचा नथुरामांनी केलेल्या गांधी हत्येमुळे सावरकर नावाच्या सूर्याला डाग पडला- शरद पोंक्षे)

आम्ही शिवसेना सोडलेली नाही

ठाकरे बापलेकांनी असे दौरे आधी केले असते तर शिवसेना आणखी मजबूत झाली असती. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मजबूत झाला असता. याचसाठी आम्ही सगळ्या ४० आमदारांनी उठाव केला. यानिमित्ताने मी खात्री देतो, शिवसेनेला गतवैभव पुन्हा प्राप्त करु, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. बंडखोरांनी राजीनामे द्यावे, या आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला उत्तर देताना पाटील म्हणाले, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ओरिजिनल शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमच्या राजीनाम्याचा विषयच येत नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही. राज्याचा विकास करणे हा आमचा ध्यास आहे, कार्यकर्त्यांची रखडलेली कामे करणे हा आमचा प्रयत्न असेल, अशी गुलाबराव पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.