ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरीतील खेडमध्ये भव्य जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे गटावर सडकून टीका केली. ‘निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. या मैदानाचं नावं चांगलं आहे, गोळीबार मैदान. पण, ही ढेगणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचं एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल,’ असं म्हणतं उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीकाला केली होती. त्याच प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते, आमदार गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘ठाकरेंसोबत मी ३५ वर्ष राहिलो आहे. त्यांचे शब्द प्रयोग चांगलेच माहित आहे. पण आम्ही रक्त देणारे ढेकूण आहोत, रक्त पिणारे ढेकूण नाही.’
‘देशाची आणि हिंदू समाजाची संपत्ती बाळासाहेब ठाकरे’
‘तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नाव वापरू नका, गरज असेल तर तुमच्या बापाचं नाव लावू दाखवा, मत मागून दाखवा’ ,या उद्धव ठाकरेंच्या टोल्यावर पुढे पाटील म्हणाले की, ‘हे पाच ते सहा वेळेला झाले आहे. त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी. याला एवढं महत्त्व देणं चुकीचं होईल. शेवटी महापुरुषांचे फोटो आणि नाव वापरणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. ती त्यांची स्वतःची संपत्ती नाही. ते त्यांचे वडील आहेत, मान्य आहे. पण ती देशाची आणि हिंदू समाजाची संपत्ती आहे. त्यामुळे त्यांचं नाव कोणीही वापरेल.’
(हेही वाचा – ..नाहीतर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल का?; रामदास कदमांचा खोचक सवाल)
Join Our WhatsApp Community