शिवसेनेची मुलुखमैदानी तोफही एकनाथ शिंदेच्या साथीला

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या आसाममध्ये गुवाहाटी येथे आहेत. शिवसेनेचे ३० पेक्षा जास्त तर काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचे म्हटले जात आहे. सध्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा शासकीय वर्षा बंगलादेखील सोडला. त्याआधी शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख असलेले आमदार गुलाबराव पाटील हेही गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यांच्यासह एकूण चार आमदार शिंदेंना मिळाले आहेत.

हॉटेलात गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंना भेटले 

आमदार गुलाबराव पाटील गुवाहाटीमधील रेनिसन्स या हॉटेलकडे जाताना त्यांना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी कैद केले. गुवाहाटी येथे हॉटेलात आमदार पाटील आणि आमदार योगेश कदम यांच्यासह चार आमदारांनी आमदार एकनाथ शिंदे यांची भेट घेतानाचे व्हिडिओही दिसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र याआधी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून बंडखोर आमदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी भावनिक होत आपली भूमिका मांडली. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा उध्दव ठाकरे यांच्या शक्तीप्रदर्शनात इच्छुकांची चेहरापट्टी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here