सध्या महाराष्ट्रात स्थानि-क निवडणुकांची रणधुमाळी रंगली आहे. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्याच्या कामांविषयी सांगताना आक्षेपार्ह विधान केले आहे. या सभेदरम्यान, गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना डिवचताना महिलांसंबंधी आक्षेपार्ह विधान केले आहे. माझ्या मतदार संघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या गालांसारखे आहेत, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
अन् घसरली जीभ
गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
आघाडी सरकार बिघडल्याचे संकेत
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरदेखील गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं. मुडंक शिवसेनेचं कंबर भाजपची आणि पाय राष्ट्रवादीचे कुठे चाललंय हे. यामध्ये बदल व्हायला हवा, सर्व एकच असायला हवं. राज्यात पालकमंत्री शिवसेनेचा, नगर विकास मंत्री शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा असंच व्हायला हवं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
नितेश राणेंची तेवढी उंची नाही
नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलण्या एवढी त्यांची उंची नाही. उद्धव साहेबांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना राजकारणात मोठे केले. त्यामुळे त्यांनी उद्धव साहेबांविषयी बोलू नये. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. यावर गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे.
( हेही वाचा :अमित शहांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे, म्हणाले… )
Join Our WhatsApp Community