शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदार संघात त्यांनी रस्त्याच्या कामांविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले. एकनाथ खडसे यांना डिवचताना त्यांनी महिलांसंबंधी आक्षेपार्ह विधान करताना ‘माझ्या मतदार संघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या गालांसारखे आहेत’, असे म्हटले. त्यावर अखेर स्वत: खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारे महिलांचा उल्लेख करणे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या हेमा मालिनी?
माझ्या गालाचा उल्लेख करण्याचा ट्रेंड हा लालू प्रसाद यादव यांच्यापासून सुरू आहे. सर्वसामान्य बोलले तर त्याचा काही परिणाम होत नाही. मात्र घटनात्मक पदावर बसल्यावर असे वक्तव्य केल्यास त्याचे वाईट परिणाम दिसून येत असतात. त्यामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे खासदार हेमा मालिनी म्हणाल्या. अशा प्रकारे महिलांचा उल्लेख करणे चुकीचे आहे, असेही हेमा मालिनी म्हणाल्या.
(हेही वाचा गुलाबराव पाटलांची घसरली जीभ, म्हणाले, ‘रस्ते हेमा मालिनीच्या गालाप्रमाणे…’)
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर टीका करताना माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला होता.
Join Our WhatsApp Community