राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सध्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना गिरगाव न्यायालयाने दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली होती, त्यानंतर बुधवार, १३ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्याच वेळी सातारा पोलीस हे सदावर्ते यांचा ताबा घेऊ शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार सातारा पोलीस सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाले. उद्या सातारा पोलीस त्यांना घेवून सातारा येथे जातील, तिथे स्थानिक न्यायालय त्यांना पोलीस कोठडी सुनावण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर चुकीचे विधान केले होते
जेव्हा गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली, तेव्हा सातारा येथे सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत चुकीचे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यासाठी सदावर्ते यांचा ताबा देण्यात यावा, अशी मागणी सातारा पोलिसांनी केली, त्यासाठी सातारा पोलीस गिरगाव न्यायालयात दाखल झाले. मात्र न्यायालयाने सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र सातारा पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेऊ शकतात, असे सांगितले. त्याप्रमाणे सातारा पोलीस आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाले आहेत.
(हेही वाचा फरार जयश्री पाटलांकडे एसटी कामगारांचे ८० लाख रुपये)
Join Our WhatsApp Community