सदावर्तेंना जामीन मिळताच जयश्री पाटील प्रकटल्या

104

एसटी कामगारांच्या संपाचे नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, बीड आणि अकोट पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये सदावर्ते यांना जामीन मिळाला, त्यामुळे आता सदावर्ते यांची सुटका होण्याची शक्यता निर्माण होताच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील माध्यमांसमोर आल्या.

सदावर्ते यांची सुटका तूर्तास नाही!

सदावर्ते यांना कोल्हापुरातील गुन्ह्यामध्ये जामीन मिळताच त्यांना मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर लागलीच पुणे पोलीस त्यांना अटक करणार आहेत, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र या प्रकरणी सदावर्ते यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात  जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सदावर्तेंचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. सदावर्ते यांना पुण्याच्या प्रकरणातून अटक होणार नाही. मात्र इतर प्रकरणात ते कोठडीत असतील. त्या प्रकरणांमधून त्यांना जामीन मिळणार नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्येच राहावे लागेल.

(हेही वाचा सदावर्तेंना उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर)

जयश्री पाटील फरार होत्या 

सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडले होते, दरम्यान जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. मुंबई पोलिसांचे संरक्षण त्यांनी का सोडले, असा सवाल उपस्थित केला जात होता. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्व सदावर्ते यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याचे दिवशी हे संरक्षण सोडले आहे. ९ एप्रिल रोजी सदावर्ते यांना न्यायालयात हजर केलेल्या दिवसांपासून त्यांनी संरक्षण सोडले होते, वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात जयश्री पाटील यांचे नाव घेतल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जयश्री पाटील यांचा पोलीस शोध घेत होते, अखेर न्यायालयाने जयश्री पाटलांना २७ एप्रिल पर्यंत संरक्षण दिले होते, म्हणून जयश्री पाटील या २६ एप्रिल रोजी सदावर्ते यांना जामीन मिळताच त्यांना आर्थर रोड कारागृहात भेटण्यासाठी गेल्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जयश्री पाटील यांनी, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असे म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.