महाराष्ट्र बंदला Gunaratna Sadavarte यांचं उच्च न्यायालयात आव्हान

144
महाराष्ट्र बंदला Gunaratna Sadavarte यांचं उच्च न्यायालयात आव्हान
महाराष्ट्र बंदला Gunaratna Sadavarte यांचं उच्च न्यायालयात आव्हान

बदलापुरातील (Badlapur Sexual Abuse Case) शाळेत (Adarsh ​​Vidya Mandir) शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे. तर, वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

(हेही वाचा –National Space Day: भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस! जाणून घ्या इतिहास…)

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी अडीच वाजता ठेवली आहे. मात्र, अशा राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरणांत न्यायालयाला ओढू नये, असेही सुनावले. त्याचवेळी, युक्तिवादाच्या वेळी कोणत्याही प्रकारचा राजकीय आरोप करु नये, असे देखील न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बजावले. मविआने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा बंद पुकारला आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. (Gunaratna Sadavarte)

(हेही वाचा –Maharashtra Band: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद; ‘या’ सेवांवर दिसू शकतो परिणाम,)

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, सर्वसामान्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे, न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करावा आणि हा बंद बेकायदा जाहीर करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयाने मात्र हे सगळे राजकीयदृष्ट्या प्रेरित असून न्यायालयाला यात ओढू नये, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे, राज्य सरकार सगळी स्थिती हाताळण्यास समर्थ असल्याचे म्हटले आहे. (Gunaratna Sadavarte)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.