संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर कामगारांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी राहत्या घरातून गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना मुंबईतील किला न्यायालयात हजर करण्यात आले. सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली होती. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी, ११ एप्रिल रोजी ही कोठडी संपली. त्यानुसार सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद!
- सुनावणीच्या वेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठमोठे खुलासे केले.
- शरद पवारांच्या घरावर चाल करून जाण्याचा कट आधीच शिजला
- हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस न्यायालयात गेले होते.
- सदावर्ते यांचा विजयोत्सव बारामतीत साजरा करण्याची मिटींग झाली होती.
- घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूर मधून व्हॉटअॅप कॉल आला होता, त्यानंतर सारी जमवाजमव सुरु झाली
- अभिषेक पाटील, सविता पवार, मोहम्मद शेखसह चौघांनी सिल्वर ओकची रेकी केली
- या प्रकरणी ४ नवीन लोकांना अटक केली आहे तर एकाच शोध सुरु आहे
- नागपूर कॉलनंतर पत्रकार पाठवा, असा मेसेज आला होता. यानंतर पत्रकारांना फोनाफोनी झाली
- मोहम्मद शेखने व्हॉट्सअॅप मेसेजचा त्यांनी हवाला दिला. यामध्ये शेखने सावधान शरद …शरद असे बॅनर तयार केले
- या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहे
- आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे.
सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांचा युक्तिवाद
- पवारांच्या घराचं कोणतही नुकसान झालं नाही, फक्त चप्पल फेक झाली, कुणलाही इजा झाली नाही
- नागपूरमधून फोन आल्याचा आरोप हवेतला
- पैसे गोळा केल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली नाही तर न्यायालयात त्याचा उल्लेख का
- हल्ला होणार हे पोलिसांना माहिती असून पोलीस का नव्हते
- आंदोलकांनाच तिथे धक्काबुक्की झाली
- स्कॉटलँड दर्जाचे पोलीस गाफील का राहिले, या आंदोलनात फक्त एसटी कर्मचारी होते
- या आंदोलनाला हल्ला म्हणता येणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा कुणालाही इजा पोहचवण्याच उद्देश नव्हता
- कर्मचाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीत कर्मचारी बेशुद्ध झाले
- सदावर्ते घटनास्थळी नव्हते, पाचशे तीस रुपयांचा उल्लेख करून तुम्हाला काय शोधायचं होतं