मी शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे, आमच्या जीवाला धोका आहे! सदावर्तेंच्या पत्नीचा आक्रोश

147

एसटी कर्मचा-यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गांवदेवी पोलिसांकडून शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. एसटी कर्मचा-यांनी शरद पवार यांच्या घरावरील केलेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे.

यानंतर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी माझ्या पतीच्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यावर मी गुन्हा दाखल केल्यामुळे शरद पवार हे दबाव तंत्र करत असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.

(हेही वाचाः पवारांच्या घरासमोरील आंदोलन, गुणरत्न सदावर्तेंना अटक)

आमच्या जीवाला धोका

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात 600 करोडच्या भ्रष्टाचाराची तक्रार मी दाखल केली आहे. याचा बदला घेण्यासाठी हे शरद पवार यांचं दबाव तंत्र आहे. माझ्या पतीच्या, माझ्या व माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आमची ही लढाई आहे, असं सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचाः पवारांच्या घरावर दगडफेक, उपमुख्यमंत्री म्हणतात हे पोलिसांचं अपयश)

पवारांचं डर्टी पॉलिटिक्स

शरद पवार यांच्या विरोधात सुद्धा मी मलबार हिल पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. सीआयडीने गेल्या आठवड्यात माझा 80 पानांचा जबाब नोंदवला आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझे पती दिवसभर न्यायालयात होते, त्यांना कुठलाही प्रकार माहीत नसताना पोलिसांनी त्यांना बेकायदेशीररित्या अटक केली आहे. शरद पवार हे पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक आरोपही जयश्री पाटील यांनी केला आहे.

(हेही वाचाः फडणवीस म्हणतात, आंदोलनकारी एसटी कर्मचा-यांचं चुकलंच)

सदावर्तेंना अटक

दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांना कलम 120-बी आणि कल्म 353 अंतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या कटात सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सदावर्तेंवर लावण्यात आलेली ही दोन्ही कलमे अजामीनपात्र आहेत.

(हेही वाचाः ‘आम्ही एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी, पण…’ घरावरील आंदोलनानंतर पवारांची प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.