आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील वादग्रस्त जिन्ना टॉवर सध्या देशभरात चर्चेला आला आहे. या ठिकाणच्या टॉवरला तिरंगा रंगात रंगवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते करत होते. त्यामुळे काही प्रमाणात या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला. याविषयी गुंटूर पूर्वचे आमदार मोहम्मद मुस्तफा यांनी, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे म्हटले आहे. मात्र आता टॉवरचे नाव बदलण्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे, असे आमदार मुस्तफा म्हणाले.
After huge protests in Andhra Pradesh,
Jinnah Tower in Guntur is now being painted with tricolour and a pole to be constructed near the tower to hoist the National Flag 🇮🇳. pic.twitter.com/RJ5Vpo4N8H
— Anshul Saxena (@AskAnshul) February 1, 2022
एपीजे अब्दुल कलाम टॉवर देण्याची मागणी
केवळ टॉवरचा रंग बदलून आम्ही शांत होणार नाहीत, असे भाजपने स्पष्ट केले आहे. टॉवरला एपीजे अब्दुल कलामांचे नाव द्याआंध्र प्रदेश भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, जिन्ना टॉवरचे नाव बदलेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. बुरुज तिरंग्याच्या रंगात रंगला, हे ठीक आहे पण त्याचे नावही बदलले पाहिजे. जिन्ना हे पाकिस्तानचे संस्थापक आहेत आणि ते भारताच्या दडपशाहीचे प्रतीक होते. जिन्ना आणि औरंगजेब यांच्यात काही फरक नाही. ज्याप्रमाणे औरंगजेब रोडचे नामकरण करण्यात आले, त्याचप्रमाणे या जिन्ना टॉवरचे नामकरण एपीजे अब्दुल कलाम टॉवर असे करण्यात यावे, असे ते म्हणाले. आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पाकिस्तानचा संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे एक टॉवर आहे. या टॉवरच्या नामांत्तराचा मुद्दा भाजपने उचलून धरला आहे. आंध्र प्रदेश सरकारने तात्काळ जिन्ना टॉवरचे नाव बदलून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव त्या टॉवरला द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
(हेही वाचा दादर येथे काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक)
जिन्नाच्या नावाने टॉवरची ओळख कशी?
1945 मध्ये फाळणीपूर्वी मोहम्मद अली जिन्ना एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी गुंटूरला आले होते. त्यावेळी काही स्थानिक मुस्लिमांनी त्यांना भेट देण्याच्या उद्देशाने या टॉवरचे नाव जिन्ना यांच्या नावावर ठेवले. या टॉवरला घुमटाच्या आकाराची रचना असलेले सहा खांब आहेत आणि स्थानिक लोक या टॉवरला सौहार्द आणि शांततेचे प्रतीक मानतात. या परिसराला सध्या जिन्ना सेंटर म्हणून ओळखले जाते.
Join Our WhatsApp Community