गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, अस म्हणत त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन केले. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, त्यांना शिवसेनेतील 40 आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश आले आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
काय म्हटलंय ट्वीटमध्ये?
“बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही,” असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ट्वीटसोबत एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचाही फोटो छापण्यात आला आहे.
( हेही वाचा: ही सत्ता जनताच बरखास्त करेल – शरद पवार )
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
स्मृतिस्थळ आणि आनंदाश्रमात जाणार
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर दर्शनासाठी जाणार आहेत. तसेच, ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात जाऊनही अभिवादन करणार आहेत.
Join Our WhatsApp Community