Gyanvapi Case : पूजा सुरुच रहाणार; सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाला पुन्हा एकदा फटकारले

Gyanvapi Case : व्यास तळघराचा प्रवेश दक्षिणेकडून आणि मशिदीचा प्रवेश उत्तरेकडून आहे. त्यामुळे दोघांचाही एकमेकांवर परिणाम होत नाही. त्यामुळे दोन्ही पूजा आपापल्या ठिकाणी चालू ठेवाव्यात, असे आम्ही निर्देश देतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

188
Gyanvapi Case : पूजा सुरुच रहाणार; सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाला पुन्हा एकदा फटकारले
Gyanvapi Case : पूजा सुरुच रहाणार; सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाला पुन्हा एकदा फटकारले

सोमवार, १ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजा करण्याविरोधात मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी केली. या वेळी मुसलमान पक्षाने हिंदूंची पूजा बंद करण्याची केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. (Gyanvapi Case)

व्यास तळघराचा प्रवेश दक्षिणेकडून आणि मशिदीचा प्रवेश उत्तरेकडून आहे. त्यामुळे दोघांचाही एकमेकांवर परिणाम होत नाही. त्यामुळे दोन्ही पूजा आपापल्या ठिकाणी चालू ठेवाव्यात, असे आम्ही निर्देश देतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

(हेही वाचा – Kalyan Lok Sabha Election : कल्याण लोकसभेसाठी उबाठा गटाचा उमेदवार ठरला ?; अयोध्या पोळ यांनी स्वतःच केली घोषणा)

मशीद समितीने दिले न्यायालयात आव्हान

“कनिष्ठ न्यायालयाने आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी दिला होता; परंतु सरकारने त्याची तात्काळ अंमलबजावणी केली. हायकोर्टातूनही आम्हाला दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरातील पूजा तात्काळ थांबवावी,” असा युक्तीवाद मशीद समितीचे वकील हुजैफा अहमदी यांनी केला आहे.

खरं तर, अंजुमन मशीद व्यवस्था समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, ज्यामध्ये हिंदूंना मशिदीच्या दक्षिणेकडील व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी देणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवण्यात आला होता. ही समिती वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे कामकाज पाहते. कनिष्ठ न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात हिंदूंना तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली होती.

यानंतर समिती उच्च न्यायालयात गेली, जिथे त्यांची याचिका २६ फेब्रुवारी रोजी फेटाळण्यात आली. उच्च न्यायालयाने ज्ञानवापीच्या दक्षिणेकडील व्यास तळघरात पूजा थांबवण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा १९९३ चा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. १९९३ मध्ये कोणताही लेखी आदेश न देता बेकायदेशीर कारवाईद्वारे पूजा बंद करण्यात आली. (Gyanvapi Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.