जानेवारी ३१ रोजी वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid Case) आवारात व्यासजी यांच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा आदेश दिला होता. आता या मुद्द्यावर तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) नेते सिद्दीकुल्ला चौधरी यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. “जर ते बंगालमध्ये आले तर आम्ही त्यांना घेरू.” असा इशारा दिला तर; ज्ञानवापी मशिदीत उपस्थित असलेल्या हिंदू पुजाऱ्यांनाही तात्काळ परिसर रिकामा करण्यास सांगितले.
(हेही वाचा – Amit Shah : भारताची संस्कृती आणि रामायण वेगळे करता येणार नाही)
मशिदीतील (Gyanvapi Masjid Case) ‘पूजेवर’ बंदी घालण्याच्या मागणीसाठी कोलकात्यात जमियत उलेमा-ए-हिंदच्या सभेत सहभागी झालेल्या चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारच्या हालचालीला परवानगी देण्यात काही अर्थ आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला. जर ते कुठेतरी थांबले (बंगालमध्ये असताना) तर त्यांना बाहेर जाऊ दिले जाणार नाही.” (Gyanvapi Masjid Case)
(हेही वाचा – Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून मनी लॉंड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल)
हिंदूंनी तात्काळ मशीद रिकामी करावी –
“हे लोक (हिंदू पुजारी) तिथे जबरदस्तीने पूजा करू लागले आहेत. ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid Case) ताबडतोब रिकामी करा.”आम्ही प्रार्थना करण्यासाठी कोणत्याही मंदिरात जात नाही, तर ते आमच्या मशिदींमध्ये का येत आहेत? मशीद ही मशीद असते. जर कोणाला मशिदीचे मंदिरात रूपांतर करायचे असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. तसे होणार नाही.” सिद्दीकुल्ला चौधरी यांनी असा धमकी वजा इशारा दिला आहे. (Gyanvapi Masjid Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community