सध्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु आहे. या सर्वेक्षणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. ज्या ठिकाणी ही मशीद आहे, त्याठिकाणी आधी शिव मंदिर होते, असा दावा हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. मात्र १७व्या शतकातच ही मशीद जमीनदोस्त झाली असती, परंतु हिंदूंनी औरंगजेबाच्या भीतीने यापासून माघार घेतली होती.
२० हजार सैन्य घेऊन आलेले मल्हारराव होळकर
ज्ञानवापी मशीद पाडून त्याठिकाणच्या शिव मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्रातील मल्हारराव होळकरांनी प्रयत्न केले होते. त्यासंबंधीचा उल्लेख शिवचरित्रकार डॉ. शिवरात्न शेटे यांनी केला आहे. औरंगजेब हा मुळात धर्मवेडा होता, मात्र 1666 नंतर त्याचे धर्मवेड आणखी वाढले. 17 ऑगस्ट 1666 साली छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली. अशा अनेक गोष्टीमुळे औरंगजेब धर्मवेड अधिक वाढले आणि 9 एप्रिल 1669 रोजी त्याने एक फतवा काढला. हिंदू देवालयांचा विध्वंस करण्याचा आदेश त्याने दिला होता. काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून औरंगजेबाने ज्ञानवापी मशीद उभारली होती. ती मशीद पाडून काशीतील मंदिराच्या पुर्नबांधणीसाठी 27 जुन 1742 मल्हारराव होळकर 20 हजार सैनिक घेऊन काशीत पोहोचले. परंतु स्थानिक पुरोहितांनी त्यांना विनंती केली की, आपण मशीद पाडून येथे पुर्नबांधणी केल्यानंतर पुन्हा एकदा औरंगेजेब आणि मुघल आमचा कतलेआम करतील, या भीतीने त्यांनी मल्हाररावांना थांबवले. मल्हाररावांनी पुरोहितांच्या विनंतीला मान दिला आणि रिकाम्या हाताने परतले. दुसरा प्रयत्न अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार करण्याचा दुसरा प्रयत्न केला. इतकेच काय तर महादजी शिंदे घराण्याच्या सुनबाई बैजाबाई शिंदे यांनी तेथे ज्ञानवापी मंडप बांधला.
(हेही वाचा पोखरणमधील ‘त्या’ शक्तीशाली स्फोटानंतर भारतात ‘हसला बुद्ध’!)
Join Our WhatsApp Community