भारतात समांतर अर्थव्यवस्था उभारण्याचे कारस्थान!

253

देशातील सर्वात मोठी ‘टेरर फंडिंग’ यंत्रणा, तसेच जागतिक पातळीवर ७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या ‘हलाल’ विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करत आहे. हलाल हे इस्लामिक पध्द्तीने प्राण्याची कत्तल करण्याची पध्द्त असून अत्यंत क्रूरतेने प्राण्याची हत्या करण्यात येते. त्याउलट हिंदू, शीख आणि ख्रिस्ती धर्मीय हे ‘झटका’ पद्धतीने मांस खातात, परंतु कालांतराने मांस व्यवसायात हलालची मक्तेदारी वाढून झटका मांस व त्याचे विक्रेते खाटीक आणि वाल्मिकी समाज यांना अलिप्त करण्यात आले. त्यांचा पारंपरिक व्यवसाय त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आला. पर्यायी इतर सर्व धर्मियांनाही हलाल पद्धतीचे मांस घ्यावे लागते. ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ मानणाऱ्या भारतातील बहुसंख्य ७८ टक्के हिंदूवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन (FDA) हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ सारख्या खाजगी मुस्लिम संस्था भारतीय उत्पादकांकडून हजारो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत.

‘हलाल प्रमाणपत्र’ नकोच

प्रत्येक कंपनी किंवा दुकानदार यांना मनसे पत्र लिहिणार आहे, त्यामध्ये कुणीही हलाल प्रमाणपत्र घेऊ नये, अशी सक्ती करणार आहे. या प्रमाणपत्रावर ताबडतोब बंदी आणण्यात यावी, अशी मागणी मनसे करत आहे. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून जो निधी जमतो, तो निधी कुठे वापरला जातो, याची चौकशी झाली पाहिजे. ही अर्थव्यवस्था सरकारी नियंत्रणाखाली आणली पाहिजे. याविषयावर सरकारी पातळीवर तोडगा काढावा, हलाल अर्थव्यवस्थेच्या नावाखाली देशात समांतर अर्थव्यवस्था उभारली जात आहे, हे गंभीर आहे.

(हेही वाचा भारत जोडो यात्रेत राहुल गांधी वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरूला विचारतात, ‘येशू ख्रिस्त देवाचे रूप आहे का?’)

पैसा थेट दहशतवादाच्या अंमलबजावणीसाठी वापरला जातो

सर्वसामान्य जनतेच्या लक्षातही येत नाही, स्वतःच्याच पैशांतून स्वतःचे मरण विकत घेत आहेत. समाजातील सर्व स्तरांतील राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना आणि संघटनांनी सहभागी होऊन ‘मॉल्स’, दुकाने, नागरिक, विविध संघटना, व्यापारी, उद्योजक, तसेच समाजातील प्रत्येक घटकांमध्ये ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात जागृती करण्याची गरज आहे. हा सर्व पैसा थेट दहशतवादाच्या अंमलबजावणीसाठी वापरला जात असेल तर या यंत्रणेवर महाराष्ट्रात आपण सर्व हिंदूंना ‘नो टू हलाल’ मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. एक चळवळ तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण या चळवळीत सामील व्हावे.

धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’

हलालची ही मक्तेदारी तोडून या षड्यंत्रात सामील असणाऱ्या सर्वांना शासन करून खाटीक व वाल्मिकी समाजास त्यांची रोजीरोटी पुन्हा मिळवून देणे व सुरक्षित करणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या मोहिमेमागचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. मूळ मांसासाठी असणारे हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौदर्यप्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, रुग्णालये यांच्यासह ‘मॅकडोनाल्ड, ‘के.एफ.सी.’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी घेतले आहे. त्यामुळे धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ भारतात उभी केली जात आहे. जागतिक स्तरावर ‘हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हा आतंकवादासाठी वापरला जात आहे. अशा बातम्या विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित झाल्या आहेत. तरी याच्या विरोधात जागृती करण्यासाठी उद्योजक, व्यापारी व नागरिकांनी निर्धार करण्याची गरज आहे.

(हेही वाचा केवळ याकूब मेमनच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ गड-किल्ल्यांवरही कबरी उभारल्यात!)

लेखक – यशवंत किल्लेदार, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.