हलाल म्हणजे जिहादच – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

131

हलाल सर्टिफिकेटच्या नावाखाली जी गुंडगिरी सुरु आहे, त्याविषयी जनजगृती करणे, जनमानसाला सावध करणे, तसेच हा प्रकार कसा सुरु झाला आणि का सुरु झाला, याविषयी अवगत करण्याचे काम सुरु आहे. एखाद्या धर्मांध संस्थांना देश लुटण्यासाठी स्वातंत्र्य दिले गेले आहे, हा जिहादच आहे, असे राजकीय विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले.

९ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समितीने संयुक्तपणे हलाल सक्ती विरोधी परिषद पार पडली. त्या पार्श्वभूमीवर ते ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलत होते. भारतातील उत्पादने असो वा परदेशातील उत्पादने जी भारतीय बाजारपेठेत येतात, जोवर ते हलाल सर्टिफिकेट घेत नाही, तोवर त्यांची विक्री करता येणार नाही, अशी सक्ती करतात. या देशात इस्लामी जिहादी शक्ती आहे, जे हे सगळे प्रकार करत असतात. हे जिहादी एअर इंडियातून प्रवास करतात आणि हलाल प्रमाणपत्र असलेले अन्न मागतात. अशा प्रकारे ही मंडळी अशा शासकीय सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये जाणीवपूर्वक अशी मागणी करतात आणि हंगामा निर्माण करतात. कारण या कंपन्याही झुकल्या जाव्यात. ही इस्लामिक अर्थव्यवस्था आहे, याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी ही हलाल सक्ती विरोधी परिषद होत आहे. ज्या उत्पादनांवर हलाल प्रमाणपत्र लावले असेल, त्याचा बहिष्कार करण्यात यावा, ९५ टक्के हिंदूंनी जर यांच्याविरोधात भूमिका घेतली तरच हलालच्या दलालांची गुंडगिरी थांबेल. भारताची अर्थव्यवस्था पोखरणारे आणि भारतातील पैसे स्वतःजवळ घेणारे हे देशद्रोही यांचा विरोध केला पाहिजे. भारतातील हिंदू व्यापारी, हिंदू एक्स्पोर्ट-इम्पोर्ट करणारे हे या विषयापासून अनभिज्ञ आहेत. अनेक प्रकारचे जिहाद झाले, त्यातील एक मोठा जिहाद म्हणजे हलाल, ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत उघडपणे गुंडागर्दी होत आहे. याविरोधात जनजागृती होण्याची गरज आहे, असेही पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले.

(हेही वाचा ‘हलाल’च्‍या सक्‍तीला ‘झटका’ देण्‍यासाठी हिंदूंची एकजूट हवीच!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.