हिंदूंनी झटका पद्धतीचेच मांस खावे, खाटीक समाजाचे विवेक घोलप यांचे आवाहन   

134

हलाल हा पशु हत्येसंबंधी मर्यादित विषय होता, त्याची व्याप्ती वाढलेली आहे. हलाल पद्धत मुसलमान धर्मांत सांगितलेली, पण  हिंदू झटका पद्धतीचे मांस खातात, देशभरात हिंदूंना त्याविषयी माहिती नाही. देवनार कत्तलखान्यात ८०-८५ झटका पद्धतीची दुकाने होती, पण मागणी नव्हती म्हणून ती दुकाने बंद करावी लागली, आता देवनारमध्ये सगळीच हलालची दुकाने आहेत, हे मोठे षडयंत्र आहे. हिंदू जेव्हा मांस खरेदी करायला जातात आणि हलालचे मांस खातात, मी आवाहन करतो की यापुढे त्यांनी झटका पद्धतीचे मांस खावे, ज्यामुळे हे संकट संपवण्यासाठी तुमचे सहकार्य होईल, असे अखिल भारतीय खाटीक महासंघाचे महाराष्ट्र प्रभारी विवेक घोलप म्हणाले.

Halal 3

हलाल ला हिंदूंनी संघटीत विरोध करावा – मोतीलाल जैन 

कोणताही विषय तडीस न्यायचा असेल, तर संघटन गरजेचे असते. हलाल विषयावरही आपल्याला संघटित व्हावे लागेल. हिंदुस्थान चांगली प्रगती करत आहे. हिंदूंना समर्थन देणारा पंतप्रधान आहे, आता त्यांनाच आपण आव्हान करतो की, त्यांनी हलाल विषय निकाली काढावा. ज्या देशाची आर्थिक स्थिती कमकुवत होते, त्याची अवस्था पाकिस्तानसारखी होते, आपल्या देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे, पण हलालच्या माध्यमातून त्याला तडा देण्याचा प्रयत्न होत आहे. हलाल विरोधात प्रत्येक हिंदूने एकत्र येण्याची गरज आहे, यात जैन समाजाचा मोठा सहभाग असेल. भारतीय अर्थव्यवस्थेवर कब्जा घेण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही त्याला विरोध करू. याआधी त्यांनी लव्ह जिहाद सुरु केले, त्यामाध्यमातून हिंदू मुलींना फसवत आहेत. या समस्येपासून अजून आपली सुटका झाली नाही, त्याबाबतही हिंदूंनी सजग रहावे, असे महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन असे म्हणाले.

हलालमधून समांतर अर्थव्यवस्थेचे कारस्थान – डॉ. विजय जंगम 

jangam

सध्या आरएसएस, बजरंग दल हे गुंड आहेत आणि असाउद्दीन ओवैसी शरीफ आहेत, ही पोलिसांची विचारधारा आहे, ती बदलली पाहिजे. माझे आयुर्वेदिक औषधे आहे, मी हलाल प्रमाणपत्र घेतले नाही, पण तरीही माझी औषधे जातात. देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण हिंदूंच हिंदूंचा विरोध करत आहेत. इस्लामी दहशतवादी संघटनांनी २०४७ देशाचे इस्लामीकरण करण्याचे कारस्थान रचले आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद सुरु आहे, आता हलाल जिहाद सुरु आहे जेवढे हलाल उत्पादने असतील त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे वीरशैव लिंगायत महासंघाचे डॉ. विजय जंगम म्हणाले.

हलाल निवडणुकीचा विषय बनवा –  संतोष गुप्ता

santosh gupta

झटका व्यवसाय महासंघाची स्थापना झाली आहे. देवनारमध्ये ३५० लोक झटका पद्धतीने मांस कापायचे, जे शहरात वितरित करायचे, आज सगळे बेकार झाले आहेत. १९९२ पासून देवनारमधून झटका पद्धतीने मांस कापणारी दुकाने बंद आहेत.  देवनारचे आधुनिकीकरण होणार आहे, त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च होणार आहे, तेव्हा फक्त झटका पद्धतीने कापले जाणार आहे, पण त्यांचे मांस खाटीक समाजाला विक्री करायला द्यावे, त्यासाठी खाटीक समाजाला दुकाने द्यावीत. हा महापालिका निवडणुकीत मुद्दा बनला जावा. अन्यथा कापणारे खाटीक असतील पण ट्रान्सपोर्ट करणारे मुसलमान आहेत, ते सगळा पैसा घेतात, आपण आता ही चैन तोडली आहे. आम्ही स्वतंत्र व्यवस्था तयार करत आहे. यात धोरणात्मक पद्धतीने काम करावे लागले, आम्ही ऑनलाईन पद्धतीनेही झटका मांस देऊ, ही सप्लाय चेन तोडण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतील हिंदू व्यापाऱ्यांनी मदत करावी, हा विषय निवडणुकीचा विषय बनवा, तळोजा येथे झटका पद्धतीच्या मांस निर्मितीचा एक प्लांट तयार केला आहे, असे झटका व्यवसायी महासंघाचे संतोष गुप्ता असे म्हणाले.

मुंबईत हलाल सक्ती विरोधी परिषद संपन्न

भारतात हलालच्या माध्यमातून मुस्लिमांची समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी होण्याची, तसेच भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुंबईत १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी ‘ब्लॉसम मीडिया’कडून ‘हलाल शो’ आयोजित केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृह येथे हलाल सक्ती विरोधी परिषदेचे आयोजन रविवार, ९ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.

हलालविरोधी परिषदेतील प्रस्ताव

tharav

  • ही परिषद स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक विधान करणार्‍या राहुल गांधींना पुरस्कारासाठी प्रतिबंधित करते.
  • समाजात धार्मिक भेदभाव निर्माण करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर भारतात बंदी घालावी.
  • हलाल प्रमाणित खाद्यपदार्थ पुरवणार्‍या के.एफ्.सी., मॅकडोनाल्ड यांसारख्या आस्थापनांमध्ये हिंदूंसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यास वचनबद्ध व्हावे.
  • हलाल प्रमाणपत्र कोणत्याही अधिकाराविना आणि अनुमतीविना जारी केले जाते, ते त्वरित रहित करावे आणि अशा संस्थांवर कायदेशीर कारवाई करावी.
  • हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थेची ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ यांच्या वतीने चौकशी करण्यात यावी. आतंकवाद्यांशी असलेले त्यांचे संबंध पडताळल्यानंतर  त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
  • या दिवाळीत ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करूया. या दिवाळीत कोणताही हिंदू हलाल वस्तू खरेदी करणार नाही.
    मांसाहार करणार्‍या हिंदूंनी आता हलाल मांसाऐवजी ‘झटका मांसा’ची मागणी करावी.
  • १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबईत ‘हलाल शो इंडिया’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हलाल प्रमाणपत्र सक्ती विरोधी परिषदेने ‘हलाल शो’ रहित करण्याच्या मागणीसाठी हलालला विरोध केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.