१२, १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत हलालच्या प्रचार प्रसारासाठी जी हलाल परिषद होणार आहे, त्याला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांना नेतृत्व द्या, मग बघा कसे ते बुडाला पाय लावून पळत सुटतात. हा विषय राज ठाकरेच चांगला हाताळू शकतात. या हलाल विरोधी आंदोलनाचे नेतृत्व राज ठाकरेंना देवून एक संधी द्यावी, मग बघा मनसेचे खळ्ळखट्याक, हा विषय आम्ही तडीस नेऊ, असा विश्वास मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला.
विषय गुंतागुंतीचा, जनजागृती करावी लागेल
हलालच्या विरोधात दोन- तीन वर्षे हिंदू संघटना काम करत आहेत. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता, मागणी काही हिंदुत्वनिष्ठ माझ्याकडे आले होते. हा कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या विषयाचे राज ठाकरेच चांगले नेतृत्व करू शकतात, असे त्यांचे म्हणणे होते. हलाल विषय हलका नाही, त्याला खरंच झटका देण्याची वेळ आली आहे. मुंबईत महिन्याला ६०० कोटींचा मांस विक्रीचा व्यवसाय होत आहे. हा सगळा व्यवसाय मुसलमानांनी हलालच्या माध्यमातून ताब्यात घेतला आहे हा विषय गंभीर आहे. त्यामुळे या विषयावर मनसे कायम पाठीशी राहील. राज ठाकरे यांना आधीच हा विषय ज्ञात आहे. विहिंपचे नेते त्यांना भेटले तेव्हाही राज ठाकरे यांनीच हा विषय विस्तृतपणे मांडला. हा विषय रस्त्यावरचा नाही, तर गुंतागुंतीचा आहे. सामान्य माणसांना झटका आणि हलाल यामधील फरक काहीच माहित नाही. त्यासाठी आधी जनजागृती करावी लागेल. त्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावे लागतील. तसेच खळ्ळखट्यात करायची वेळ आली आहे. त्यांना बूस्टर द्यायची वेळ आली आहे. आताच बूस्टर दिला नाही तर आपले भविष्य कठीण आहे, असेही किल्लेदार म्हणाले.
(हेही वाचा हलाल विरोधी आंदोलन संधी, आर्थिक बहिष्कार टाकून आपला पैसा हिंदू व्यापाऱ्यांनाच द्या, रणजित सावरकरांचे आवाहन)
हा मुसलमानांचा चंचू प्रवेश
शेळी-मेंढी पाळणारे ग्रामीण भागातील हिंदू आहेत, पण मांस विक्रीच्या व्यवसाय मधल्या मध्ये मुसलमानांनी ताब्यात घेतल्याने हिंदू शेळी- मेंढी पाळणारे यांना योग्य मोबदला मिळत नाही. सगळा पैसा मधली चेन ताब्यात असलेले मुसलमान घेतात. जर मुसलमानांना हलाल मांस खाण्याचा अधिकार आहे, तर मग हिंदूंना झटका मांस खाण्याचा अधिकार आहेच ना, हा चंचू प्रवेश आहे, त्यांचा हेतू चांगला नाही. आपला खाटीक समाजच दिसेनासा झाला आहे. हा मांसाहारपुरता विषय मर्यादित राहिला नाही, कृती समिती स्थापन करून हा विषय राजकीय व्यासपीठावर न्यावा लागेल, असेही यशवंत किल्लेदार म्हणाले.
मुंबईत हलाल सक्ती विरोधी परिषद संपन्न
भारतात हलालच्या माध्यमातून मुस्लिमांची समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी होण्याची, तसेच भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुंबईत १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी ‘ब्लॉसम मीडिया’कडून ‘हलाल शो’ आयोजित केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृह येथे हलाल सक्ती विरोधी परिषदेचे आयोजन रविवार, ९ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी लिहिलेल्या ‘हलाल जिहाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हा व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी खासदार डॉ. विजय सोनकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवला, अखिल भारतीय खाटीक महासंघाचे महाराष्ट्र प्रभारी विवेक घोलप, महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन, वीरशैव लिंगायत महासंघाचे डॉ. विजय जंगम, झटका व्यवसायी महासंघाचे संतोष गुप्ता हे उपस्थित होते.
(हेही वाचा हलाल हा झिजिया करच, ‘हलाल’ला ‘झटका’ देण्याचे रमेश शिंदेंचे परिषदेत आवाहन)
Join Our WhatsApp Community