जागतिक पातळीवर समांतर इस्लामिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशासाठी हलाल संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. कालपर्यंत हलाल संकल्पना केवळ मांसाच्या संबंधी मर्यादित होती, ती आता औषधे, सौंदर्य प्रसाधने, हॉटेल इंडस्ट्री, गृहनिर्माण असा बहुतांश क्षेत्रात लागू करून याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आज याच हलाल अर्थव्यवस्थेने भारतातही पाळेमुळे रोवली असून याचा अधिकाधिक प्रसार व्हावा, या उद्देशाने मुंबईत चक्क ‘हलाल शो इंडिया’ या नावाने हलाल परिषद आयोजित करण्यात आली आहे.
हलाल उत्पादनाचा सर्व व्यासपीठावरून प्रचार प्रसार
१२ आणि १३ नोव्हेंबर २०२२ हे दोन दिवस मरिन लाईन येथील इस्लाम जिमखाना येथे ही परिषद होणार आहे. ब्लॉसम मीडिया या संस्थेच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. ब्लॉसम मीडिया ही एकमेव भारतातील अनेकविध संकल्पना राबवणारी संस्था आहे. भारतातील मुसलमान ग्राहक बाजारपेठ वेगाने विस्तारित करण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. हलाल उत्पादनांना सर्व व्यासपीठावरून प्रचार प्रसार करण्याची यंत्रणा या संस्थेकडे असल्याचा दावा ब्लॉसम मीडिया संस्थेने केला आहे.
(हेही वाचा भिकाऱ्यांना लखपती बनवणाऱ्या मुंबईतील ठिकाणांवर टोळ्यांचा कब्जा; उत्पन्नावर ठरवला जातोय जागेचा दर)
८० टक्के हिंदूंवर थोपवले जाते इस्लामी अर्थव्यवस्था
सध्या हलालचा विस्तार भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. मुसलमान ग्राहक हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करण्यासाठी आग्रही असल्याने त्यांचा विविध कंपन्यांना फटका बसत आहे. त्यामुळे भारतातील कंपन्याही आता हलाल प्रमाणपत्र घेऊ लागल्या आहेत. हे प्रमाणपत्र हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट आणि जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया, ग्लोबल इस्लामिक शरीया सर्व्हिसेस या संस्था देत आहेत, ज्यांचा भारत सरकारशी काहीही संबंध नाही, त्यांचा पैसा थेट इस्लामी अर्थव्यवस्थेकडे जमा होत आहे. विशेष म्हणजे भारतात ८० टक्के हिंदू ग्राहक संख्या असतानाही केवळ १५ टक्के मुसलमानांसाठी ८० टक्के हिंदूंना जबरदस्तीने हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे युरोपमधील डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि इंग्लंड आदी अनेक देशांमध्ये हलालला विरोध होऊ लागला आहे, तसा भारतातही याला विरोध सुरु झाला आहे.
Join Our WhatsApp Community