‘हलाल’च्या विरोधात हिंदूंचा जनक्षोभ उसळणार – डाॅ. उदय धुरी

177
भारतातील बहुसंख्य हिंदू, शीख, जैन, बौद्ध अशा धर्मियांवर हलालची सक्ती करून मुसलमान मनमानीपणा करत आहेत, हा भारताच्या सार्वभौमत्वासाठी धोकादायक आहे. या ‘हलाल’च्या प्रचार प्रसारासाठी मुंबईत १२, १३ नोव्हेंबर रोजी ‘हलाल शो’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याला कडाडून विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ९ ऑक्टोबर रोजी हलाल सक्ती विरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून हिंदू धर्मातील सर्व समाजघटक हलालच्या विरोधात एकवटणार असून हलालच्या विरोधात जनक्षोभ उसळणार आहे, असा विश्वास हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक डॉ. उदय धुरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. विजय जंगम, अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी विवेक घोलप हे उपस्थित होते.
हलालचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होत आहे, भारतातील व्यापाऱ्यांची कशी मुस्कटदाबी केली जात आहे, हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून मुस्लिम संस्था पैसे गोळा करून तो कसा दहशतवादासाठी वापरतात, हलालमुळे मुसलमानांचा धर्मांधपणा कसा वाढत आहे, या सर्व विषयाचा खुलासा हलाल सक्ती विरोधी परिषदेत केला जाणार आहे. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी लिहिलेले ‘हलाल जिहाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. धुरी यांनी दिली.

…तर खाटीक समाजाला महत्व प्राप्त होईल 

हिंदू आणि शीख धर्मीयांसाठी हलाल मांस खाणे निषिद्ध आहे, या धर्मात झटका पद्धतीचे मांस मान्य आहे. मात्र बहुतांश मांस विक्री व्यवसायावर मुसलमानांचे नियंत्रण आले आहे. त्यामुळे ते बहुसंख्य हिंदूंना हलाल मांस खायला घालत आहेत. आता याबाबत हलाल सक्ती विरोधी परिषदेच्या माध्यमातून हिंदूंचे प्रबोधन केले जाईल आणि खाटीक समाजाच्या व्यवसायाला महत्व प्राप्त होईल, असे अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी विवेक घोलप म्हणाले. तर हलाल विषय केवळ मांसा पुरता मर्यादित न राहता बिस्कीट, पाणी, स्टेशनरी या वस्तूंनाही हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जात आहे. हिंदू व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान होईल अशी भीती दाखवून त्यांना हलाल प्रमाणपत्र घेण्यास भाग पाडले जात आहे. कोणत्याही खासगी, स्वयंसेवी संस्थेला असे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही, तरीही मुसलमान संघटना हे प्रमाणपत्र घेण्यास व्यापाऱ्यांना सक्ती करत असून तो पैसा दहशतवादाला पुरवत आहेत, असे अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. विजय जंगम म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.