मंत्रीजी, हात खिशातून बाहेर; लोकसभा अध्यक्ष Om Birla भडकले

289
मंत्रीजी, हात खिशातून बाहेर; लोकसभा अध्यक्ष Om Birla भडकले
मंत्रीजी, हात खिशातून बाहेर; लोकसभा अध्यक्ष Om Birla भडकले

लोकसभा आणि विधानसभेत लोकप्रतिनिधींचे वर्तन हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. एकमेकांवर कागदाचे बोळे फेकून मारणे, वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करणे याचे व्हिडिओ सातत्याने प्रसारित होत असतात. आता खिशातून हात बाहेर काढा, असे लोकसभा अध्यक्ष सांगतांनाचा व्हिडिओ समोर आला आहे.

(हेही वाचा – Recruitment Scam : मुंबई अग्निशमन दल फायरमन भरती घोटाळा; मनपाच्या २ लिपिकांसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल)

सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून 2024 च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. अधिवेशन चालू असताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला एका मंत्र्यावर संतापले. संसदेची कार्यवाही सुरू असतानाच एक मंत्री खिशात हात टाकून संसदेत आले. यावरून अध्यक्ष ओम बिरला संतापले. आपली नाराजी व्यक्त करत ओम बिर्ला म्हणाले, ‘मंत्रीजी हात खिशातून बाहेर. माननीय सदस्यांनो, मी आपल्याला आग्रह करतो की, हात खिशात टाकून सभागृहात येऊ नका. ठीक आहे ना…’

यानंतर, मंत्री महोदयांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. याव ओम बिर्ला आणखी भडकले. ते म्हणाले, “मंत्री महोदय आपण मधेच का बोलत आहात? काय विचारायचे आहे जरा सांगा. हात खिशात टाकण्याला आपण परवानगी द्याल का? दुसरी विनंती अशी आहे की, जेव्हा एखादा माननीय सदस्य बोलत असेल, तेव्हा कुणीही त्याला क्रॉस करून समोर बसू नये. त्यांच्या मागे जाऊन बसावे.

गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. भारतात कर इंग्लंडप्रमाणे वसूल केला जातो. मात्र सेवा सोमालियाप्रमाणे दिल्या जातात. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने कर लावत सर्वसामान्यांचे रक्त शोषले, असा आरोप केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.