Loudspeaker row: ‘या’ राज्यातील १ हजार मंदिरात पहाटे वाजणार हनुमान चालीसा!

99

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ३ जाहीर सभा घेतल्या. पाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध दर्शवत हिंदुत्व मुद्द्याचे रणशिंग फुकले. मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आणि लाऊडस्पीकर लावण्यासंदर्भात काही मर्यादा सरकारने निश्चित केल्या. परंतु, कर्नाटक सरकार कर्नाटकातील मशिदींवरील भोंगे हटवण्याची कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी सोमवारपासून मोठी मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर मशिदींवर लावलेल्या भोंग्यांविरुद्ध कारवाई करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक केला. तसेच राज्य सरकारला ८ मे पर्यंत सर्व मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता, परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर कर्नाटकातील तब्बल एक हजार मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर लावण्यात आले असून यावर आता रोज पहाटे हनुमान चालीसेचे पठण होणार असल्याचे श्री राम सेनेचे राज्य प्रमुख सिद्धलिंग स्वामी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – NIA ची मोठी कारवाई, दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या मुंबईतील 20 अड्ड्यांवर छापेमारी)

आज पहाटेपासून भोंग्यांवर हनुमान चालीसाचे पठण

या जाहीर केलेल्या घोषणेनुसार, सोमवारी पहाटे ४ वाजल्यापासून या हजार मंदिरांतून हनुमान चालीसाचे पठण भोंग्यांवरून करण्यात येणार आहे. हनुमान चालीसाचे पठण करायचे की लाऊडस्पीकरवर भक्तीगीतं, काकड आरती वाजवायचे हे संबंधित मंदिर प्रशासनच ठरवणार असल्याचे सांगितले जात आहे. अजान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत मशिदींमध्ये हे चालीसा पठण केले जाईल. सोमवारच्या मोहिमेनंतरही मशिदींवरून भोंगे न हटवल्यास राज्यातील अन्य मंदिरांमध्येही भोंगे लावण्यात येणार असल्याचा इशारा सिद्धलिंग यांनी दिला होता.

जर कारवाई झाल्यास आम्ही तयार आहोत…

दरम्यान, कर्नाटकात हिजाब वाद, बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येनंतर श्रीराम सेना व बजरंग दलाकडून मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरण्यात आला आहे. मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवणाऱ्यांवर पोलिस-प्रशासनाकडून कारवाई झाल्यास संघटना त्यासाठी तयार असल्याचे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम आम्ही राज्य सरकारला दिला होता, त्यावर कारवाई झाली नाही, तर आता आम्ही आमच्या बाजूने कारवाई करण्यास मोकळे आहोत, असे हिंदू संघटनांकडून सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.