दादरमधील हनुमान मंदिर पाडले जाणार नाही; भाजपा नेते Kirit Somaiya यांची ग्वाही

219

दादरच्या ८० वर्षे जुनं हनुमानाचं मंदिर (Dadar Hanuman Mandir) पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. दादरमधील हनुमान मंदिर हे पाडले जाणार नाही किंवा तोडले जाणार नाही अशी ग्वाही भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले. या संदर्भात शुक्रवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला आहे. त्यांचे अधिकृत स्पष्टिकरण देखील येणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान शनिवार, १४ डिसेंबरला दुपारी ४ वाजता दादर येथिल हनुमान मंदिरात (Hanuman mandir) जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी एक्सच्या माध्यमातून दिली. (Kirit Somaiya)

दादर रेल्वे स्थानकावर असलेल्या हनुमान मंदिरावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. त्यानंतर भाजपाने देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पलटवार केला होता. आता आमदार आदित्य ठाकरे हे हनुमान मंदिरात महाआरती करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. यावरून आता भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ‘हनुमान चालीसा वाचणाऱ्या भक्तांना जेलमध्ये टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता हनुमानाच्या शरणी जावं लागत आहे. त्यांनी मौलाना सज्जाद नोमानी, उलेमा बोर्ड, मराठी मुस्लिम सेवा संघ, वोट जिहादचे शरण स्वीकारले आहे. त्यांनी तिथेच राहावे.’ अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

(हेही वाचा – Mumbai Water Cut : शनिवार, रविवार मुंबईत १५ टक्के पाणी कपात)

दरम्यान, हनुमान मंदिर आणि बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही लगावला आहे. एका फोनमध्ये मोदींनी युक्रेनचं युद्ध थांबवलं. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर (Bangladesh Hindu Atrocities) पावलं उचलावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी रेल्वे विभागाला तसं पत्र देखील पाठवलं आहे. तसेच “दादरला हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटीसीचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मला दिले आहे.  अनेक दशके जुने हनुमान मंदिर पाडता येणार नाही”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.