‘हर हर महादेव’ मारहाण प्रकरण, फडणवीस म्हणाले कायदा हातात घेणे सहन करणार नाही

143

हर हर महादेव चित्रपटातून इतिहासाची मोडतोड करण्यात आली, असा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉल येथे या चित्रपटाला विरोध करताना प्रेक्षकांनाही मारहाण केली. त्याचे तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत कायदा हातात घेणे सहन केले जाणार नाही, अशा शब्दांत इशारा दिला.

जर कुणाला त्याबद्दल आक्षेप असतील, तर त्यांनी सनदशीर पद्धतीने मांडावे, पण अशा पद्धतीने कुणी थिएटरमध्ये घुसून लोकांना मारत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. अशांवर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला.

(हेही वाचा अखेर ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द, हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचा परिणाम(

अब्दुल सत्तार यांनाही विरोध

हर हर महादेव सिनेमावरून राज्यात राडा सुरू आहे. ठिकठिकाणी सिनेमे बंद पाडले जात आहे. तसेच,  कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. आचारसहिंता दोन्ही बाजूने पाळली पाहिजे. सत्तार चुकले. पण खोक्यांची भाषा योग्य नाही. राजकारणामध्ये बोलण्याची पातळी खूप खाली चालली आहे. सगळीकडच्या लोकांनी आचारसंहिता पाळली पाहिजे, मोठ्या नेत्यांनी आपल्या लोकांना सांगितले नाही, तोवर हे शक्य नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फडणवीस यांनी तक्रार केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.