‘… सत्ता गेल्याने पुरोगाम्यांची फालतूगिरी!’, शरद पोंक्षेंचा राष्ट्रवादीवर घणाघात

155

राज्यभरात सध्या हर हर महादेव या चित्रपटावरून चांगलंच राजकारण पेटल्याचे पाहायला मिळत आहे. काही पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. तर चुकीचा इतिहास दाखवून प्रेक्षकांची आणि महाराष्ट्राची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी पक्षाने हर हर महादेव या चित्रपटावर केला. इतकेच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या चित्रपटाचे शो बंद पाडण्यासाठी राडेही केले. दरम्यान, या चित्रपटावर आता अभिनेते आणि शिंदे गटाचे उपनेते शरद पोंक्षे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर चांगलाच घणाघात केला.

(हेही वाचा – Earthquake: अंदमान निकोबार बेटांवर ४.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे हादरे)

काय म्हणाले शरद पोंक्षे

राज्यातील सत्ता गेल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही सगळी फालतू गिरी सुरू असल्याचा आरोप पोंक्षे यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. पुरोगाम्यांना हिंदू राष्ट्र म्हणणे आवडत नाही. हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र नको आहे याचा त्यांना‌ त्रास होतो, असा आरोप पोंक्षे यांनी केला. पंढरपूर येथे हिंदू महासभेच्या वतीने त्यांना क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदूत्व शॉर्या पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी त्यांनी हर हर महादेव चित्रपटाला नाहक विरोध केल्या प्रकरणी ही टीका केली.

पुढे ते असेही म्हणाले, हा केवळ मुर्खपणा आहे. चित्रपट सेन्सॉर झाला आहे. मी त्या चित्रपटात काम केले आहे. आमच्या दिग्दर्शनकाने सेन्सॉरला संपूर्ण चित्रपट तयार करताना पुरावे सादर केले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दोन महिन्यांनतर यांना सुचले, चित्रपटाक कोणतीही मोडतोड झालेली नाही, असे असतानाही याबाबत आक्षेप घेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांशी चित्रपटाचे दिग्दर्शक भेट घेणार आहेत, असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सेन्सॉर संमत असलेला चालू सिनेमा बंद पाडता. प्रेक्षकांना मारहाण करता हा हलकटपणा आहे, तुम्ही गुंड आहात का? स्वतःला पुरोगामी समजता ना? मग तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकरांनी हेच शिकवलं का? या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर सिनेमा बघणाऱ्यांना नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत पोंक्षेंनी जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.