अमेरिकेने ओसामा बिन लादेन आणि कासिम सुलेमानी या दोन दहशतवाद्यांना दुसऱ्या देशात घुसून मारले, तसेच जर भारताने हरदीप सिंह निज्जरला कॅनडात घुसून मारले असेल, तर त्यात चूक काय, असा प्रश्न पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबीन यांनी केला आहे. (Hardeep Singh Nijjar) खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्या राजनैतिक संबंधांत जो तणाव निर्माण झाला आहे, त्यावर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला; पण पेंटागॉनच्या एका अधिकाऱ्याने अमेरिकेला त्यावरून सुनावले आहे.
(हेही वाचा – Mumbai Airport : धावपट्ट्यांच्या दुरुस्तीकरिता मुंबई विमानतळ १७ ऑक्टोबरला बंद, विमानतळ प्रशासनाचा निर्णय)
मायकेल रुबीन पुढे म्हणाले, ”अमेरिकन प्रशासन ज्या आंतरराष्ट्रीय दडपशाहीबद्दल बोलत आहे, तो आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे. हरदीपसिंग निज्जर हा काही साधा प्लंबर नव्हता. त्याचे हात शेकडो निरपराध्यांच्या रक्ताने माखले होते. अमेरिकेने इराक युद्धात जे केले, ओसामा बिन लादेन आणि सुलेमान कासिम सुलेमानला ज्या पद्धतीने दुसऱ्या देशांमध्ये घुसून मारले, त्याच पद्धतीने जर भारत आणि हरदीप सिंग निज्जरला कॅनडात घुसून मारले असेल, तर त्या चूक काय ?” (Hardeep Singh Nijjar)
यावर्षी मार्चमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंगजवळ २ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या. त्याच्या हत्येनंतर खलिस्तानी समर्थकांनी कॅनडा, लंडन आणि अमेरिकेसह अनेक ठिकाणी निदर्शने केली आणि भारतविरोधी घोषणा दिल्या. निज्जरच्या हत्येसाठी कॅनडाने भारताला जबाबदार धरले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत (हाऊस ऑफ कॉमन्स) खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले आणि ते म्हणाले की, “कॅनडाच्या सुरक्षा संस्था भारत सरकार आणि कॅनडाच्या नागरिकांची चौकशी करत आहेत. हरदीपसिंह निज्जर यांचा हत्येतील सहभागाबद्दल आम्ही सक्रियपणे चौकशी करत आहोत. कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये इतर कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही.” (Hardeep Singh Nijjar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community