लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले. भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुती ४५ पार करील असा आत्मविश्वास व्यक्त करत होते, मात्र प्रत्यक्षात १७ जागा जिंकल्या, २८ जागांचे नुकसान झाले. या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. आता भाजपाचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचे ट्विट चर्चेत आले आहे. यामध्ये कंबोज यांनी एक व्यक्तीची लाईन छोटी करण्याच्या भानगडीत पक्षाचे नुकसान केले आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे कंबोज यांचा रोख नक्की कुणाकडे आहे, यावर चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हणाले मोहित कंबोज?
भाजपा महाराष्ट्र आणि भाजपा मुंबई यांनी आता वस्तुस्थिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी कोण घेणार? केवळ एका व्यक्तीची लाईन छोटी करण्याच्या भानगडीत पक्षाचे नुकसान केले आहे. महाराष्ट्र वरिष्ठ नेते, मंत्री यांनी जबाबदारी घ्यावी, असे मोहित कंबोज (Mohit Kamboj) म्हणाले आहेत.
BJP Maharashtra & BJP Mumbai need to have reality check !
Who is going to take responsibility of this defeat ?सिर्फ़ एक आदमी की लाइन छोटी करने के चकर में पार्टी का नुक़सान किया !
Maharashtra Senior leaders , Ministers accountability to be done !@BJP4Maharashtra @BJP4Mumbai
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 5, 2024
या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी झालेल्या पराभवाची मी स्वतः जबाबदारी स्वीकारत आहे. कारण माझ्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढलो. आम्ही विरोधकांनी जे नेरेटिव्ह मांडले त्याचा प्रतिवाद करण्यात अपयशी ठरलो, असे फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या भूमिकेनंतर आता मनोज कंबोज (Mohit Kamboj) यांचे ट्विट चर्चेत आले आहे.
Join Our WhatsApp Community