Harshvardhan Patil : राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील

राष्ट्रीय सहकार साखर संघावर गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रीय सहकार साखर संघाची सत्ता भाजपकडे येताच संघाच्या अध्यक्षपदाची धुरा महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

307
Harshvardhan Patil : राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील

माजी सहकारमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय स्तरावरील मोठी जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह यांच्या ‘गुडबुक’मध्ये असलेल्या पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Harshvardhan Patil)

या निवडीबद्दल हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. या निवडीमुळे हर्षवर्धन पाटील हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा एकदा आले आहेत. राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्षपद महाराष्ट्राकडे आल्यानंतर संघाचे उपाध्यक्षपद हे गुजरातकडे देण्यात आले आहे. केतनभाई पटेल यांचीही त्या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही निवडी महत्त्वपूर्ण ठरतात. (Harshvardhan Patil)

(हेही वाचा – UBT Group च्या बड्या नेत्याने घेतली भाजप मंत्र्यांची भेट; बंद दाराआड चर्चा)

राष्ट्रीय सहकार साखर संघावर गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रीय सहकार साखर संघाची सत्ता भाजपकडे येताच संघाच्या अध्यक्षपदाची धुरा महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. साखर संघाचे अध्यक्षपद देऊन भाजपने माजी मंत्री पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे. (Harshvardhan Patil)

हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकार साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच, तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखानाही त्यांच्या ताब्यात आहे. याशिवाय खासगी साखर कारखाना चालवण्याचाही अनुभव पाटील यांच्या पाठीशी आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या निवडीने महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त हेात आहे. (Harshvardhan Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.