हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Election) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात जागा वाटपावर कोणताही समझोता झालेला नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांत आघाडी होण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे आप 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आप रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. काँग्रेसने ‘आप’च्या मागण्या फेटाळल्यानंतर आघाडी होण्याची शक्यता बंद झाली आहे.
10 जागांची मागणी
हरियाणात निवडणूक (Haryana Assembly Election) लढवण्यासाठी आप 10 जागांची मागणी करत होती, ती काँग्रेसने फेटाळून लावली. उल्लेखनीय बाब म्हणजे, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांच्या आघाडीमुळे भाजपाला राज्यात आणखी एक क्लीन स्वीप करण्यापासून रोखल्यानंतर राहुल गांधी आपसोबत युती करण्यास उत्सुक असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते.
(हेही वाचा शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फिक्स; पण उद्धव ठाकरे नाही; Devendra Fadnavis यांचा दावा)
काँग्रेसला 9 पैकी 5 जागांवर विजय मिळवता आला
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 9 तर ‘आप’ने 1 जागा लढवली होती. काँग्रेसला 9 पैकी 5 जागांवर विजय मिळवता आला. ‘आप’ने लढवलेली एकमेव जागा गमावली.
Join Our WhatsApp Community