Haryana Assembly Elections : महाराष्ट्रातील प्रयोगाची हरियाणात लिटमस टेस्ट

137
Haryana Assembly Election : हरियाणात मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

ज्या आमदारांचे रिपोर्टकार्ड योग्य नाही त्या आमदारांचे विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट कापण्याची तयारी भाजपाने केली आहे. मात्र हा प्रयोग आधी हरियाणात केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू कश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. हरियाणात एका टप्प्यांत निवडणूक होणार आहे. दोन्ही राज्यात ९०-९० जागा आहेत. (Haryana Assembly Elections)

सत्ताधारी भाजपासह सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. उमेदवारांची नावे ठरविण्यापूर्वी भाजपाकडून मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली नसली तरी भाजपाने आपली तयारी पूर्ण केली आहे. महाराष्ट्रात केलेल्या मतदारसंघनिहाय सर्वेत कितीतरी आमदारांप्रती लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर, स्थानिक लोकांची पसंती दुसऱ्याला असल्याचे दिसून आले आहे. यामुळे भाजपाकडून महाराष्ट्रातील विद्यमान आमदारांचे तिकीट कोणतीही दयामया न दाखविता कापले जाणार आहे, अशी चर्चा आहे. महाराष्ट्रात कुणाचे तिकीट कापले जाते हे तर निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच कळेल.

(हेही वाचा – गणेशोत्सव येताच Mumbai-Goa Highway चे राजकारण सुरु)

जनतेचा विश्वास जिंकण्याचा भाजपा असा करणार प्रयत्न

सद्यस्थितीत हा प्रयोग हरियाणात केला जाणार आहे. सूत्रानुसार हरियाणात भाजपाच्या दोन डझन आमदारांच्या तिकिटांवर टांगती तलवार आहे. हरियाणची सत्ता मिळविण्यासाठी भाजपा तिसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे. सत्ता विरोधी लाट असल्यामुळे भाजपाला चिंता आहे. भाजपा विजयी चेहऱ्यांच्या शोधात असताना डझनभराहून अधिक विद्यमान आमदारांची कपात होणार हे निश्चित मानले जात आहे. अनेक विद्यमान आमदारांविरोधात भाजपाच्या गोटात प्रचंड संताप असल्याचे संकेत मिळाले आहेत. जनक्षोभ कमी करण्यासाठी त्यांचे तिकीट कापून नवीन चेहरे मैदानात उतरवून जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे.

हरियाणा राज्यातील सर्व ९० विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांकडून अभिप्राय घेऊन संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५० ते १०० नावे पुढे आली आहेत. पण पक्ष जिंकण्याची क्षमता असलेल्यांचा गांभीर्याने विचार करीत आहे. भाजपाच्या सर्व जिल्हा निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षाचे संघटन सरचिटणीस फणींद्रनाथ शर्मा यांना सादर केला आहे. येत्या दोन-चार दिवसांत हा अहवाल प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश प्रभारी यांच्या माध्यमातून केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचणार आहे. (Haryana Assembly Elections)

(हेही वाचा – Rain Updates : ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत पावसाचे दिवस फक्त पाच)

केंद्रीय नेतृत्व आपल्या अंतर्गत सर्वेक्षण अहवालाशी या पॅनेलमधील नावांची जुळवाजुळव करेल. तोपर्यंत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकत्रितपणे पावले टाकत राज्यात तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. संघातील नेत्यांचा समावेश असलेली समन्वय समितीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये आरएसएस आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीत आक्रमक रणनीती आखण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपा सरकारच्या विरोधातील दहा वर्षांची सत्ता विरोधी लाट संपुष्टात आणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरविण्यात आले आहे. (Haryana Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.