Indi Alliance चा फुगा फुटला; कॉंग्रेस-आप हरियाणात स्वतंत्र लढणार

59
Indi Alliance चा फुगा फुटला; कॉंग्रेस-आप हरियाणात स्वतंत्र लढणार

इंडी आघाडीतील घटक पक्षांचे नेते ते सर्व एकजूट असल्याचा देखावा करीत होते ही बाब आता स्पष्ट झाली आहे. लोकसभेची निवडणूक संपताच कॉंग्रेसने आम आदमी पक्षाला झटकले आहे. हरियाणाच्या निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा दावा कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. (Indi Alliance)

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. या तीन राज्यांसोबतच जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा विधानसभेची निवडणूक होणे आहे. अशात, कॉंग्रेसने आम आदमी पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि आपने हरियाणात मिळून निवडणूक लढविली होती. परंतु, हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने आम आदमी पक्षाला सोबत घेण्यास नकार दिला आहे. (Indi Alliance)

काँग्रेस आप आघाडी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी पुन्हा एकदा वेगळे झाले आहेत. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. खुद्द काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे. हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आप यांच्यात युतीला वाव नाही, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी जाहीर केले. (Indi Alliance)

(हेही वाचा – Delhi Rain : दिल्लीसह २६ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा!)

इंडी आघाडी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एकत्र लढणार 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये इंडी आघाडी एकत्र निवडणुका लढवणार आहे. मात्र, या राज्यांत निवडणुकीचा फार्मुला काय असेल? यावर अद्याप चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि इतर आघाडीतील घटक पक्षाचे नेते आघाडीवर सहमत असतील तेथेच इंडी आघाडी एकत्र लढेल. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स भविष्यात विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार का, असे विचारले असता रमेश म्हणाले की, झारखंड आणि महाराष्ट्रात युती करणार आहे. (Indi Alliance)

पंजाबमध्येही मार्ग वेगळा

जयराम रमेश म्हणाले की, पंजाबमध्ये काँग्रेस-आपमध्ये आघाडी होणार नाही. हरियाणात आम्ही लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) एक जागा दिली होती, मात्र विधानसभा निवडणुकीत ती एकत्र लढता येणार नाही, असे ते म्हणाले.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, दिल्लीतील आम आदमी पक्षानेच विधानसभा निवडणुकीत इंडी आघाडीशी युती होणार नसल्याचे सांगितले आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आप यांनी एकत्र लोकसभा निवडणूक लढवली, तर पंजाबमध्ये दोघांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. (Indi Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.