हरियाणा विधानसभा निवडणूकीत (Haryana Assembly Election) भाजपने ‘जाट विरुद्ध गैर-जाट’चा राबवलेला फॉर्म्यूला यशस्वी ठरला आहे. गैर जाटांना एकत्र केल्याने भाजपला जाटांच्या बालेकिल्यातही ९ नवीन जागा जिंकता आल्या आहेत. तसेच हरियाणाच्या ५७ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे.
दि. ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेचा (Haryana Assembly Election) निकाल जाहिर झाला. या निवडणूकीत भाजपने ५० जागा, काँग्रेसने ३५ जागा आणि इतर पक्षाने ५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्यांदा हरियाणात (Haryana Assembly Election) भाजपची सत्ता स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. याआधी भाजपने २०१९ मध्ये ४० तर २०१४ मध्ये ४७ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकात भाजपने २२ नवीन जागा जिंकल्या आणि विद्यामान २७ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
भाजपचा जाट विरुद्ध गैर-जाट फॉर्म्यूला काय?
हरियाणात ३६ समुदाय आहेत. यामध्ये सर्वाधिक २७ टक्के जाट समाज आहे. त्यामुळे भाजपने जाटेतर राजकारणावर लक्ष दिले. भाजपला ब्राम्हण, पंजाबी, बनिया आणि राजपूत मतांवर विश्वास होता. याशिवाय मागास आणि दलित व्होट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न पक्षाने केला. त्यामुळे २०१४ आणि २०१९ नंतर हा फॉर्म्युला तिसऱ्यांदा यशस्वी झाला आहे.
Join Our WhatsApp Community