लोकसभा निवडणूक 2024 नंतर आज देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल (Haryana Election Result 2024) जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर ही ती दोन राज्य आहेत. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. मागच्या 10 वर्षांपासून हरियाणामध्ये (Haryana Election Result 2024) भाजपाची सत्ता आहे. विविध एक्झिट पोलच्या चाचण्यांनी हरियाणात काँग्रेसच सरकार येणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, आता हरियाणातील चित्र बदलताना दिसत आहे.
हरियाणात मतमोजणी रंगतदार बनली आहे. पहिल्या तासाभरात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. बहुमतापेक्षा जास्त जागा मिळणार असं दिसत होतं. पण अचानक चित्र पालटलं आहे. भाजपा आता काँग्रेसच्या पुढे निघून गेली आहे. भाजपा 49 तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. हरियाणात अटी-तटीचा सामना सुरु आहे. (Haryana Election Result 2024)
हरियाणातील महत्त्वाच्या मतदारसंघात काय स्थिती? (Haryana Election Result 2024)
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) लाडवा विधानसभा क्षेत्रातून आघाडीवर
जुलानामधून विनेश फोगाट (Vinesh Phogat) आघाडीवर
अंबाला कँटमधून अनिव विज पुढे
कैथलमधून आदित्य सुरजेवाला आघाडीवर
रानियामधून अर्जुन चौटाला आघाडीवर
गढी सांपला-किलोईमधून भूपेंद्र सिंह हुड्डा पुढे
तोशाममधून श्रुती चौधरी आघाडीवर
हरियाणाच्या इंदरवालमधून अपक्ष उमेदवार जीएम सरूरी आघाडीवर.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community