हरियाणा विधानसभेच्या (Haryana Legislative Assembly) 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज, मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. यात सकाळी 11 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला राज्यात 49 जागांवर आघाडी मिळाली आहे. (Haryana Elections Results 2024)
(हेही वाचा – Dipa Karmakar : भारताची पहिली ऑलिम्पिक जिमनॅस्ट दीपा कर्माकरची अचानक निवृत्ती)
मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेसला 51 जागांवर आघाडी मिळाली होती. तर भाजपची 27 जागांवर सरशी होताना दिसून आली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहात दिसून आले. काँग्रेसकडून जल्लोषही साजरा व्हायला लागला होता. परंतु, मतमोजणी पुढे जाऊ लागल्या चित्र पालटू लागले. सकाळी 10 वाजेपासून आकडेवारीत फरक पडू लागले. त्यानंतर 11 वाजता भाजपची 49 जागांवर सरशी झाली. तर काँग्रेस 35 जागांवर पुढे होती. तर आयएनएलडी 2 आणि इतर 4 जागांवर पुढे आहेत. हरियाणा विधानसभेत बहुमतासाठी 48 जागांची आवश्यकता असून राज्यात भाजपला बहुमत मिळल्याचे चित्र आहे. (Haryana Elections Results 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community