Haryana Elections Results 2024: हरियाणात गेम फिरला! भाजपाचे पुनरागमन, सेलिब्रेशनची तयारी करणाऱ्या काँग्रेसला दणका

113
Haryana Elections Results 2024: हरियाणात गेम फिरला! भाजपाचे पुनरागमन, सेलिब्रेशनची तयारी करणाऱ्या काँग्रेसला दणका
Haryana Elections Results 2024: हरियाणात गेम फिरला! भाजपाचे पुनरागमन, सेलिब्रेशनची तयारी करणाऱ्या काँग्रेसला दणका

हरियाणा (Haryana Elections Results 2024) आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर आता जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर होत आहेत.

(हेही वाचा-Pune News: गरबा खेळत असताना भोवळ आली, आणि घडलं असं काही…पहा व्हिडीओ)

मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेस (Congress) पक्षाने 60 जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष हरियाणात सत्ता स्थापन करणार, असे संकेत मिळत होते. त्यामुळे दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनची तयारी सुरु केली होती. याठिकाणी काँग्रेसने जिलेबी वाटायला सुरुवात केली होती. मात्र, सुरुवातीला दीड तास उलटल्यानंतर हरियाणातील मतमोजणीत एक ट्विस्ट आला. (Haryana Elections Results 2024)

(हेही वाचा-Assembly Election Result 2024: Jammu & Kashmir, Haryana च्या जनतेचा कौल कोणाला? कोण मारणार बाजी?)

भाजपाने (BJP) अचानक मुसंडी मारत आता 50 जागांपर्यंत आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीच्या टप्प्यात 60 जागांवर आघाडी घेतलेल्या काँग्रेसची 35 पर्यंत घसरण झाली आहे. हरियाणा विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजप या आकड्याच्या पुढे आहे. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकते. (Haryana Elections Results 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.