देशात लपलेल्या गद्दारांपासून सावध राहा – अनिल विज

गृहमंत्र्यांनी देशवासीयांना इशारा दिला

84

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी देशवासियांना सावध करत इशारा दिला आहे. ते असे म्हणाले, देशात लपलेल्या गद्दारांपासून सावध राहावे लागणार आहे. यासंदर्भात विज यांनी ट्विट केले की, “पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यावर भारतात फटाके फोडणाऱ्यांचा डीएनए भारतीय असू शकत नाही. त्यामुळे तुमच्या घरात लपलेल्या गद्दारांपासून सावध रहा”.

तर दुसरीकडे, या क्रिकेट सामन्यातील पराभवामुळे भारताला T20 विश्वचषक मिळू शकतो, असा विश्वास क्रिकेट प्रेमींसह चाहत्यांना वाटतो, कारण या सामन्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू पुढील आगामी सामन्यांमध्ये अधिक चांगल्याप्रकारे कामगिरी करतील आणि भारत संघाला विजयी करतील.

(हेही वाचा – मुंबई गुन्हे शाखा पथकाची कारवाई, २४ किलो चरससह चौघांना अटक)

विशेष म्हणजे रविवारी यूएईमध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा दहा गडी राखून पराभव केला. या विश्वचषकातील त्यांचा सलग सहावा विजय नाकारला. भारतासमोर विजयासाठी १५२ धावांचे आव्हान असताना पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजांनी एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले. २००७ ते २०१६ या काळात भारत विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडून कधीही हरलेला नाही. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने प्रथमच भारतावर विजय मिळवला आहे.

विराटकडून शिका”; मेहबुबा मुफ्तींचे वक्तव्य

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद केलेल्या क्रिकेट प्रेमी, चाहत्यांच्या समर्थनार्थ समोर आल्या आहेत. यासह संतप्त लोकांना विराट कोहलीकडून काहीतरी शिका असा सल्ला देखील दिला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केले आहे. ‘पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींवर एवढा राग का? देश के गद्दार को गोली मारो…अशा घोषणाही काही लोक देत आहेत. विराट कोहलीकडून शिका, ज्याने सर्वप्रथम पाकिस्तानी संघाचे अभिनंदन केले’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.