Bihar Politics : नितीश कुमार यांचा वारसदार खरंच ठरला आहे का?

158
Bihar Politics : नितीश कुमार यांचा वारसदार खरंच ठरला आहे का?
  • वंदना बर्वे

राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. एकीकडे पक्ष बळकावण्यासाठी आतुर सत्तातूर दिसतात. तर दुसरीकडे मात्र मुलाला राजकारणात स्वारस्य नसल्याने एका माजी प्रशासनिक अधिकाऱ्याला एक मुख्यमंत्री उत्तराधिकारी करणार असल्याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. (Bihar Politics)

राज्य आहे बिहार आणि मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. तर त्यांचा मुलगा निशांत कुमार याला राजकारणात अजिबात पडायचे नसल्याने माजी आयएएस अधिकारी मनीष वर्मा यांना जेडीयू पक्षात महत्वाचं पद देण्यात आलं असल्याचे बोललं जात आहे. यामुळे खरंच कुटुंबातील व्यक्ती सोडून बाहेरच्या व्यक्तीला पक्ष सोपवणार काय?, असे अनेक प्रश्न बिहारच्या राजकारणात चर्चिले जात आहे. शिवाय नितीश कुमार यांचे वय झाल्यामुळेच त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. (Bihar Politics)

मनीष वर्मा यांचे नाव आघाडीवर असण्याचे कारण…

मनीष वर्मा यांना जेडीयूचे राष्ट्रीय महासचिव करण्यात आले आहे. त्यामुळे आता पक्षात नितीश कुमार यांच्यानंतर वर्मा हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते असतील, अशी चर्चा आहे. त्याआधी या पदावर आरसीपी सिंह होते. तेही नितीशबाबूंची अत्यंत विश्वासू नेते मानले जात होते. पण ते पक्षातून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्मा यांना सक्रीय राजकारणात उतरवले आहे. (Bihar Politics)

कुमार यांचा उत्तराधिकारी कोण, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. ते आपल्या कुटुंबातील सदस्याला नव्हे तर माजी आयएएस अधिकाऱ्याला पसंती देणार असल्याची चर्चा आहे. निवृत्त आयएएस अधिकारी मनीष वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. (Bihar Politics)

वर्मा हे बिहारमध्ये पटना आणि पूर्णिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी जेडीयूचे उमेदवार असलेल्या १६ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. त्यापैकी १२ मतदारसंघात पक्षाला विजय मिळाला. त्यामुळे जेडीयूचे केंद्र सरकारमध्ये वजन वाढले. (Bihar Politics)

(हेही वाचा – Jammu-Kashmir संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची ताकद वाढणार)

नितीश कुमार यांचे विश्वासू आरसीपी सिंह कुठे आहे?

वर्मा यांना जेडीयूमध्ये अधिकृत प्रवेश देत नितीश कुमारांनी पक्षांतर्गत विरोधकांना संदेश दिल्याचे मानले जात आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्याकडे त्यांचा रोख असल्याचे मानले जाते. नितीश कुमार यांचे विश्वासू आरसीपी सिंह हे पक्षाला सोडून गेले आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तसेच केंद्रात मंत्रीही होते. नितीश यांच्यानंतर त्यांचाच पक्षात क्रमांक होता. त्यांची जागा आता वर्मा घेणार असल्याची चर्चा आहे. (Bihar Politics)

मनीष वर्मा हे २००० च्या तुकडीतील आयएएस अधिकारी होते. त्यांनी २०१८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नितीश कुमार यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. निवृत्तीनंतर ते नितीश कुमारांसाठी काम करत होते. ते जेडीयूचे सदस्य बनले असून महासचिव (संघटन) ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मागील वर्षभरापासून ते कोणत्याही पदाशिवाय संघटनात्मक काम करत आहेत. (Bihar Politics)

निशांत कुमार काय करतात?

नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे राजकारणापासून चार हात लांब आहेत. ते कधीही वडिलांसोबत सार्वजनिक व्यासपीठावर दिसत नाहीत. तसेच निवडणुकीच्या राजकारणातही ते नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे कधीही राजकीय वारसदार म्हणून पाहिले गेले नाही. (Bihar Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.