Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवारांना ‘जोर का झटका’ देण्याची शरद पवारांची खेळी; अजित पवारांना बारामती सोडावी लागणार?

अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न लपून राहिलेले नाही. त्यामुळे गुरुवारी १५ ऑगस्टला त्यांनी निवडणूक न लढवण्याचे सुतोवाच केले असले तरी ते पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

184

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना पहिला झटका दिल्यानंतर आता विधानसभेला आणखी एक ‘जोर का झटका’ देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांना बारामती विधानसभादेखील कठीण होऊन बसली असून अजित पवार यांना बारामती सोडून पुण्यातून निवडणूक लढवावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अजित पवार यांची राजकीय कोंडी

लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा यांचा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर शरद पवार गटाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आणि त्यांनी अजित पवार यांचे पुतणे यूगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांच्या विरोधात निवडणुकीला उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित करून एकप्रकारे अजित पवार यांची राजकीय कोंडी केली.

(हेही वाचा उर्दू भाषेसाठी कोट्यवधींची खैरात; Sanskrit भाषेचे पुरस्कार मात्र अनुदानाअभावी बंद करण्याची वेळ)

हरल्यास राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

यूगेंद्रविरुद्ध अजित पवार जिंकून आले तरी अजितदादांसाठी हा विजय फार मोठा ठरणार नाही आणि शरद पवारांचा पराभव म्हणता येणार नाही. मात्र या लढतीत अजित पवार (Ajit Pawar) यांचा पराभव यूगेंद्र यांच्याकडून झाल्यास अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. याच कारणांमुळे अजित पवार त्यांचे द्वितीय पूत्र जय यांना यूगेंद्र यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता अधिक आहे.

मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आहेच

अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न लपून राहिलेले नाही. त्यामुळे गुरुवारी १५ ऑगस्टला त्यांनी निवडणूक न लढवण्याचे सुतोवाच केले असले तरी ते पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांचा बारामतीत जसा जनसंपर्क आहे तसा पुणे परिसरातही आहे. गेली अनेक वर्षे अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद सांभाळले असून आता त्यांचे नाव पुण्याशी जोडले जाते. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदार संघ मुलासाठी सोडला तरी पुणे हा एक पर्याय अद्याप त्यांच्यासमोर आहे. विधान परिषदेतून, मागच्या दाराने, मुख्यमंत्री होणे हे अजित पवार यांच्यासारख्या राजकारण्याला रुचणारे नाही, असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयातील एका कार्यकर्त्याने व्यक्त केले. (Sharad Pawar)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.