द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊन ठाकरेंनी शिवसेना वाचवली आहे का?

183

शिवसेनेचे खासदार अमित शाह यांना भेटले अशी बातमी होती. या पार्श्वभीमीवर ठाकरेंनी न मागता आपला पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना दिला. बिन बुलाए मेहमान असाच हा प्रकार होता. द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रात आल्या तरी त्यांनी मातोश्रीला भेट दिली नाही. त्यामुळे बाळासाहेबांनी निर्माण केलेला मातोश्रीचा दरारा आणि आदर आता संपलेला आहे. मित्रपक्ष असताना भाजपाने ठाकरेंना खूप मान-सन्मान दिला. पण आता आम्ही तुमचे लाड पुरवणार नाही हा संदेश त्यांनी दिलेला आहे.

शिवसेना वाचवली आहे का?

ठाकरेंनी द्रौपदी मुर्मूंना एकाच कारणासाठी पाठिंबा दिलेला आहे. ते कारण म्हणजे जर त्यांनी पाठिंबा दिला नसता तर त्यांच्या खासदारांनी बंड केलं असतं. ठाकरे सध्या डॅमेज कंट्रोल करायला निघाले आहेत. त्यात आणखी एक डॅमेज त्यांना नको होतं. पण उद्धव ठाकरेंनी मुर्मू यांना पाठिंबा जाहिर करुन खरोखर शिवसेना तुटण्यापासून वाचवली आहे का?

( हेही वाचा : Shiv sena: गळती सुरुच! आता विजय शिवतारे यांची ठाकरेंकडून हकालपट्टी)

खरं पाहता आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा हा प्रकार आहे. किमान मुंबई पालिकेची निवडणूक होईपर्यंत तरी त्यांना उरलेली शिवसेना फुटू द्यायची नाही. शिवसेनेच्या खासदारांना माहिती आहे की नरेंद्र मोदींच्या नावाशिवाय सगळेच निवडून येऊ शकत नाही. कारण हे सगळे मोदी लाटेत कॉंग्रेसचा विरोध करत निवडून आले आहेत.

देशाचा कौल पाहता जनतेने कॉंग्रेसला धूळ चारलेली आहे. आणि अशा कॉंग्रेससोबत शिवसेनेने आघाडी केली. यामुळे शिवसेनेचे नेते व मतदारही संभ्रमात पडलेले आहेत. त्यामुळे उरलेली ठाकरेंची शिवसेना देखील फुटणार आहे. फक्त वेळ अजून ठरलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.