कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हसनसो मुश्रीफ फाउंडेशन या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केला आहे. सध्या महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या भाषणात राष्ट्रपुरुषांच्या उल्लेख येताच तो आदरार्थी केला की अवमानकारक केला हे पाहून त्यांच्यावर टीकेची झोड उगारली जात आहे. यात मुख्यत्वे भाजपच्या नेत्यांवर टीका होत आहे, अशा वेळी राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या संस्थेकडून झालेल्या अवमानाची पोस्ट सोशल मीडियात जोरदार फिरत आहे.
(हेही वाचा पाकिस्तानचा खोडसाळपणा; हिंदूंना हिंसक दाखवून बदनाम करणारी वेब सिरीज; ट्रेलरनंतर संतापाची लाट)
सध्या सोशल मीडियामध्ये एका सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका जोरदार फिरत आहे. ही प्रश्नपत्रिका पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी – २ वर्ष २०२०-२१ ची आहे. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने ही सराव परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार होते आणि त्यामध्ये हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री होते. या फाउंडेशनच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्न विचारण्यात आले, त्यातील पहिला प्रश्न असा होता की,
– कासीमभाईंनी त्यांचे घर दलाला मार्फत ९,५०,००० रुपयांत विकले. त्यांना त्याबद्दल ३ टक्के दलाली द्यावी लागली. तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले?
या प्रश्नाच्या खालीच दुसरा प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये असे म्हटले की,
– जर संभाजीचा पगार शिवाजीपेक्षा साडेबारा टक्क्यांनी जास्त असल्यास शिवाजीचा पगार संभाजीपेक्षा शेकडा कीर्तीने कमी आहे?
या दोन्ही प्रश्नांमध्ये पहिल्या प्रश्नामध्ये मुसलमान व्यक्तीचा नामोल्लेख कासीमभाई असा करत या फाउंडेशनने आदर दिला आहे. परंतु त्याचवेळी दुसऱ्या प्रश्नात मात्र महाराष्ट्रासाठी आदर्श असणारे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांचा नामोल्लेख असलेल्या व्यक्तींचा उल्लेख एकेरी करून महाराष्ट्रद्वेष दाखवून दिला आहे. त्यामुळे सध्या ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियात जोरदार व्हायरल होते असून लोक त्यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
Join Our WhatsApp Community