पुण्यातील व्यवसायिकांचे हसन मुश्रीफ कनेक्शन; ईडीची मोठी कारवाई

134

हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाने पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच पुण्यात ९ ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे.

( हेही वाचा :  राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदारांचे कामबंद आंदोलन! वाढीव वेतनासाठी २८०० अधिकारी संपावर)

पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी छापेमारी 

हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. पुणे शहरातील सॉलसबारी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवलेला आहे.

ईडीच्या रडारवर 

हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित नातेवाईक तसेच व्यवसायिकांवर यापूर्वीही ईडीने छापेमारी करत कारवाई केलेली आहे. त्यानंतर पुन्हा सोमवारी मोठ्या प्रमाणात छापेमारी होत असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. आमदार हसन मुश्रीफ सध्या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली असून मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.