हातकणंगले हा लोकसभा मतदार संघ हा दोन जिल्ह्यात विभागला जातो. ज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात शिवसेनेचे धैर्यशील माने, स्वाभिमान पक्षाचे राजू शेट्टी आणि उबाठा शिवसेनेचे सत्यजित पाटील यांच्यातच प्रमुख लढत असून यापूर्वी दोन वेळा खासदार बनलेल्या राजू शेट्टींची हॅट्रीक माने यांनी रोखली असली तरी यंदा माने यांच्यासमोर राजु शेट्टी यांच्यासह उबाठा शिवसेनेचे सत्यजित पाटील यांचेही आव्हान आहे. त्यामुळे राजू शेट्टी आणि सत्यजित माने यांचे आव्हान माने कसे पेलवतात याकडे सर्व सर्व जनतेचे लक्ष आहेत. (Hatkanangale Lok Sabha Election 2024)
राजू शेट्टी लढवतात स्वबळावर
राजु शेट्टी हेच महाविकास आघाडीचे उमेदवारी असतील असा अंदाज वर्तवला जात होते. त्यामुळे शेट्टी यांच्याकडे आघाडीचे उमेदवार म्हणून पाहिले जात असले तरी प्रत्यक्षात शिवसेनेकडे हा मतदार संघ असल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेच्या वतीने सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केली. (Hatkanangale Lok Sabha Election 2024)
पाच टर्म बाळासाहेबांनी मारली होती बाजी
हातकणंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदार संघ असून अनेक वर्षे काँग्रेस आणि त्यानंतर पुढे राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदार संघावर राज्य केले. विशेषत: बाळासाहेब माने, त्यांची सून निवेदिता आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने असे खासदार बनले आहे. १९७७ ते १९९१ अशा पाच टर्ममध्ये काँग्रेसचे बाळासाहेब माने यांनी येथून बाजी मारली होती. त्यानंतर काँग्रेसकडून कल्लप्पा आवाडे यांनी दोन वेळा विजय मिळवला होता. पण जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा त्यांनी या पक्षात प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवेदिता माने या दोन वेळा खासदार झाल्या होत्या. (Hatkanangale Lok Sabha Election 2024)
साखर सम्राटांचा हा बालेकिल्ला
त्यानंतर कोणत्याही आर्थिक वा राजकीय पाठिंबा नसताना साखर सम्राटांच्या या बालेकिल्ल्याला राजू शेट्टी यांनी दोन वेळा हादरा दिला आणि शेतकऱ्यांची ताकद संसदेत पोहोचवली होती. सन २००९ मध्ये राजू शेट्टी यांनी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला होता, पण सन २०१४मध्ये जागा वाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतरही राजू शेट्टी यांना जागा सोडण्यात आली होती. त्यामुळे शेट्टी यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली. मात्र, राजू शेट्टी यांचा झंझावात गेल्या निवडणुकीत निष्प्रभ ठरला. शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झाले. (Hatkanangale Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी निवड झालेले इंग्लिश क्रिकेटपटू आयपीएल अर्धवट सोडणार)
काही समस्या या अनेक वर्षांपासून जशाच्या तशाच
हा मतदार संघ ऊस पट्ट्यात येत असल्याने ऊस उरासंदर्भातील केंद्र आणि राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे. या मतदार संघात इचलकरंजी हे सर्वांत मोठे शहर असून या शहाराच्या मतावर सर्वच पक्षाचा डोळा आहे. इचलकरंजीत पाणी प्रश्न मोठा असून या लोकसभा मतदार संघातील काही समस्या या अनेक वर्षांपासून जशाच्या तशाच आहे. यामध्ये पंचगंगा प्रदुषण, महापूर तसेच प्रस्तावित शक्ती महामार्ग अशा काही प्रमुख समस्या आहेत. नदीकाठच्या गावातील लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणारी पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्याच्या संकल्पनेला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे या लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची वाढती संख्या, अंतर्गत हेवेदावे, गटबाजी, पर्यायी उमेदवार आदींच्या पार्श्वभूमीवर मत विभागणीचा धोका निर्माण झाला आहे. (Hatkanangale Lok Sabha Election 2024)
सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार
धैर्यशील माने, शिवसेना
सत्यजित पाटील, उबाठा शिवसेना
राजू शेट्टी, स्वाभिमान पक्ष
डी.सी. पाटील, वंचित बहुजन आघाडी
- शाहुवाडी : विनय कोरे, जेएसएस
- हातकंणगले : राजू आवळे, काँग्रेस
- इचलकरंजी : प्रकाशअण्णा आवाडे, अपक्ष
- शिरोल : राजेंद्र पाटील अपक्ष
- इस्लामपुर : जयंत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
- शिराळा : मानसिंग नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
सन २०१९चा निकाल
धैर्यशिल माने, शिवसेना : ५, ८५, ७७६
राजु शेट्टी, स्वाभिमान पक्ष : ४, ८९,७३७
अस्लम सय्यद , वंचित : १, २३, ४१०
सन २०१४चा निकाल
राजु शेट्टी, स्वाभिमान पक्ष : ६, ४०, ४२८
कल्लप्पा आवाडे, काँग्रेस : ४ ६२, ६१८
सन २००९ चा निकाल
राजु शेट्टी, स्वाभिमान पक्ष : ४, ८१, ०२४
निवेदिता माने, राष्ट्रवादी काँग्रेस : ३,८५,९६५
रघुनाथ पाटील, शिवसेना : ५५,०५० (Hatkanangale Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community