Shrikant Shinde : तुमच्या आणि माझ्या कमाईच्या स्त्रोतावर खुली चर्चा करू; श्रीकांत शिंदे यांचा पलटवार

128
Shrikant Shinde : तुमच्या आणि माझ्या कमाईच्या स्त्रोतावर खुली चर्चा करू; श्रीकांत शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर
Shrikant Shinde : तुमच्या आणि माझ्या कमाईच्या स्त्रोतावर खुली चर्चा करू; श्रीकांत शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर

उबाठा गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. (Shrikant Shinde) ‘मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत समोरासमोर चर्चा करावी’, असे आव्हान त्यांनी दिले होते. या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘जेलचं कोणाला सांगता, कंपनी स्थापन होण्याअगोदर तुम्ही टेंडर दिले आहेत. हे सगळे काळे कागद कोणाचे आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाला जेलमध्ये जावे लागेल ते कळेल. तुम्ही चर्चेला या, तुमच्या कमाईचा स्त्रोत आणि माझ्या कमाईचा स्त्रोत यावर खुली चर्चा करू, असे आव्हान श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे. (Shrikant Shinde)

(हेही वाचा – Paralysis 0f Schoolgirls : धक्कादायक ! 90 शाळकरी मुली एकाच वेळी लुळ्या झाल्या; सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल)

मुख्यमंत्र्यांनी पक्षासाठी काठ्या खाल्ल्या आहेत, गुन्हे दाखल करून घेतले आहेत. तुम्ही काय केले ? तुम्ही सभा घेण्यासाठी कुठे जायचा, तेव्हा तुमचा फूड ट्रँक तुमच्यासोबत असायचा. जर काही मिळाले नाही, तर आम्ही आणायला जायचो. ह्यांना सँडविच लागायचा, स्पिंगला लागायचा. तेव्हा आम्ही नांदेडला असलो, तर एकजण संभाजीनगरला जायचा, एकाला हैदराबादला पाठवायचे. त्यांना कोल्ड कॉफी आवडायची, म्हणून आम्ही त्यांच्या गाडीमध्ये कोल्ड कॉफी ठेवायचो, सँडविच ठेवायचो, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली. (Shrikant Shinde)

‘कोविड काळात केलेला भ्रष्टाचार, बीएमसीमध्ये केलेला भ्रष्टाचार आता समोर येत आहे. जेलमध्ये जाण्याच्या भीतीनेच हे मोदींचे पाय धरायला गेले होते’, असा दावाही श्रीकांत शिंदेंनी केला आहे. चॅलेंज इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचे सेशन एकापाठोपाठ एक होते. त्या वेळी आदित्य ठाकरे यांनी ही  टीका केली. (Shrikant Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.