“बाळासाहेब ठाकरे-वाजपेयींच्या सभेला मैदान भरलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली!” आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा

98

शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे. अलिकडेच तानाजी सावंत यांनी शिवसेना आमदारांच्या मतपरिवर्तनासाठी मी राज्यात तब्बल १५० बैठका घेतल्या असे वक्तव्य केले होते त्यांचे हे व्हिडिओ बरेच व्हायरल सुद्धा झाले आहेत. परंतु आता त्यांनी एक नवे धाडसी वक्तव्य केले आहे. मंगळवारी आयोजित कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी आपल्या सभांना बाळासाहेब ठाकरेंच्या सभेपेक्षा जास्त गर्दी जमल्याचा दावा केला.

( हेही वाचा : मुंबईसह ठाण्यात एप्रिल महिन्यात पाणीबाणी : १५ टक्के राहणार पाणीकपात)

काय म्हणाले तानाजी सावंत?

आपल्या सोलापूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा माहिती आहे की, जे पटांगण आपण सभेसाठी घेतले होते ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याही सभेला पूर्ण भरलं नाही. आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही सभा झाल्या, त्यावेळी सुद्धा हे मैदान भरलं नव्हतं, अडवाणीजी यांच्याही सभेला गर्दी नव्हती. पण, ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी २०१७-१८ च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून करुन दाखवली” हा इतिहास आहे. सावंत बंधूंच्या नियोजनामुळेच उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी जमली असे तानाजी सावंत यावेळी म्हणाले.

राजकीय वर्तुळात चर्चा

२०१९ मध्ये मंत्रिमंडळ विस्तान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मी सर्वात आधी बंडखोरी केली, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी छत्रपती संभाजीनगर येथेस केला. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वत: मिळून १५० बैठका घेतल्या आणि आमदारांचे मन वळवले असा दावाही मंत्री सावंत यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.