पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर ईडीकडून राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी होणारी सुनावणी हे वेळेअभावी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
(हेही वाचाः संजय राऊतांचे परतणे अनेकांच्या लांगले जिव्हारी)
ईडीचा युक्तिवाद काय?
ईडीने केलेल्या आरोपांमुळे 103 दिवस आर्थर रोड तुरुंगात घालवणा-या संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आणि उद्धव ठाकरे गटात नवचैतन्य निर्माण झाल्यासारखे झाले. खुद्द उद्धव ठाकरे यांनी देखील राऊतांचे अभिनंदन केले. पण ईडीकडून मात्र राऊतांच्या जामनावर स्थगिती आणण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पीएमएलए न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची आम्हाला संधी मिळावी, असा युक्तिवाद ईडीने केला आहे. त्यामुळे ईडीच्या याचिकेवरील उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयाचे ईडीवर ताशेरे
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने दोन्ही आरोपींना बेकायदेशीररित्या अटक केली आहे. दिवाणी खटल्यांना मनी लॉंन्ड्रिंगच्या नावाखाली आणून व्यक्तींना अटक करणं हे न्यायालयाला मान्य नाही. या प्रकरणी राकेश आणि सारंग वाधवान हे दोघे आरोपी असताना संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे दोघंही निर्देष असल्याचे सांगत विशेष न्यायालयाने ईडीवर ताशेरे ओढले होते.
(हेही वाचाः ‘संजय राठोड हा विषय आता आपण थांबवूया’, चित्रा वाघ यांचे मोठे विधान)
Join Our WhatsApp Community