शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) प्रकरणचा निकाल कधी आणि केव्हा लागतो याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असताना शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत सुप्रीम कोर्टात उद्या म्हणजेच शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ही सुनावणी एक दिवस आधीच म्हणजेच आज गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. विधानसभा अध्यक्ष सुनावणी नंतर लगेच दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अधिक माहितीनुसार, जी – २० देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) तिकडे जाणार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती आहे. अचानक बदललेल्या वेळापत्रकावर सध्या राजकीय वर्तुळातून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
(हेही वाचा – Cabinet Approves MoU : भारत-फ्रान्स यांच्यात डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत होणार सामंजस्य करार)
असं असेल आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक
१. आमदार अपात्रतेच्या संदर्भात १२ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे.
२. नोव्हेंबर २३ नंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार आहे.
३. सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या या ठाकरे गटाच्या मागणीवर उद्या सुनावणी होणार
मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांना या सुनावणीबाबत एक निश्चित वेळापत्रक तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणावरील सुनावणीसाठी एक निश्चित वेळापत्रक तयारही केलं होतं. या वेळापत्रकानुसार आमदार अपात्रतेची सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार होती. मात्र आता ही सुनावणी एक दिवस आधीच होणार आहे.
दरम्यान अपात्र (MLA Disqualification Case) आमदारांच्या सुनावणीबाबतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community