आर्यन खान आजचीही रात्र तुरूंगातच काढणार!

आर्यन खान औषधांच्या बेकायदेशीर खरेदीसाठी 'आंतरराष्ट्रीय औषध नेटवर्क'चा भाग असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात होता, असे एनसीबीने म्हटले.

किंग खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर बुधवारी सत्र न्यायालयात दिवसभर सुनावणी सुरू होती. न्यायालयात आर्यनसह अन्य तीन जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आर्यन खान याला आजचीही रात्र तुरूंगातच काढावी लागणार आहे.

काय म्हटले आर्यन खानच्या वकिलाने?

प्रतीक गाबा याच्या निमंत्रणावरून आर्यन खान त्यादिवशी क्रूझवर गेला होता, मात्र तो क्रूझवर पोहोचण्याआधीच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट यांना अडवण्यात आले, त्यांना कोर्टासमोर तपासण्यास नकार देत एनसीबी अधिकारी त्यांना तपासू शकतात याला संमती दिली आणि त्यांच्याकडेही ड्रग्स आहे, असे त्यांनी मान्य केले. विक्रांत चोकर आणि इष्मीत सिंग यांनाही क्रूझवर जाताना एनसीबी अधिकाऱ्यांनी अडवले आणि विचारले की त्यांच्याकडे ड्रग्स आहे का, तर त्यांनी ‘हो’ म्हणून स्वतःकडचे ड्रग्स काढून एनसीबी अधिकाऱ्यांना दाखवले, असे एनसीबीचा पंचनामा म्हणतो आहे. पण वास्तव हे आहे की, आर्यन खान याच्याकडे काहीही सापडले नाही. पण एनसीबीच्या पंचनाम्यात असे म्हणण्यात आले आहे की, अरबाझकडे सापडलेले चरस आर्यन खान क्रूझ पार्टीत वापरणार होता हे त्याने मान्य केले. एनसीबीच्या पंचनाम्यानुसार आर्यनकडे ना ड्रग्स सापडले ना पैसे. जर त्याच्याकडे पैसेच नाहीत तर तो ड्रग्स विकत घेऊन सेवन कसे करू शकतो ना, विकत घेऊ शकतो. आर्यन आणि जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सचाही संबंध नाही. एनसीबीने दुसऱ्यांदा ज्यावेळी आर्यनचा रिमांड मागितला त्यावेळी आधीच्याच रिमांडमधल्या मुद्द्यांचा आधारे मागण्यात आला. एनसीबी ड्रग्स प्रकरणात अनेकांना अटक करतेय ही चांगली गोष्ट आहे, पण ज्यांच्याकडे काहीही सापडले नाही, त्यांना असे अडकवून ठेवणे चुकीचे आहे. यांचा दुसऱ्यांदा रिमांड मिळेपर्यंत दुसऱ्या आरोपींना अटक करून कोर्टात हजरही केले नाही, असे वकिल अमित देसाई म्हणाले.

(हेही वाचा : एनसीबीची कारवाई दिखाऊपणाची! शरद पवारांचा आरोप)

काय म्हटले मूनमूनच्या वकिलाने!

अरबाझ मर्चंटचे वकील तारक सय्यद म्हणाले की, पंचनाम्यात मोबाईल फोन सापडल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही, मग व्हाट्सए चॅटचा संबंधच येत नाही. मूनमूनचे वकील अली काशिफ म्हणाले की, माझ्याविरोधातील केस पूर्णपणे बनाव आहे. मला बलदेव नावाच्या इसमाने पार्टीसाठी बोलावले होते, म्हणून मी गेले होते, त्याला अटक करण्यात आली नाही आणि मला अटक करण्यात आली, असे मूनमूनचे वकील म्हणाले. जर एका रूममध्ये ड्रग्स सापडले तर सगळ्यांची चौकशी व्हायला हवी होती, ती न होता मला अटक करण्यात आली. क्रूझवर 1300 लोक होती, सोमिया नावाच्या मुलीकडे रोलिंग पेपर सापडला पण तिला जाऊ देण्यात आले. मला पार्टीत ग्लॅमर यावा म्हणून बोलावण्यात आले होते माझ्याकडे काहीही सापडले नाही, असे वकील तारक सय्यद म्हणाले.

आर्यन खान ‘आंतरराष्ट्रीय औषध नेटवर्क’चा भाग

दरम्यान आज एनसीबीने खुलासा करत सांगितले की, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा आपला मित्र आणि या प्रकरणातील आणखी एक आरोपी असणारा अरबाजकडून कॉन्ट्राबँड खरेदी करत असे. तसेच आर्यन खान औषधांच्या बेकायदेशीर खरेदीसाठी ‘आंतरराष्ट्रीय औषध नेटवर्क’चा भाग असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात होता. तसेच आरोपी क्रमांक १७ अचित कुमार आणि क्रमांक १९ शिवराज हरिजन आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाजला ड्रग्स पुरवत असल्याचेही एनसीबीने म्हटले आहे. आर्यन खान आणि अरबाज हे नेहमीच एकमेकांसोबत असतात, त्यामुळे दोघांचाही यात हात असणार म्हणत दोघेही एनडीपीएसच्या कलम २९ लागू करण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here