‘तारीख पे तारीख…’ राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे आता दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 12 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. पण आता ही सुनावणी पुढे ढकलत ती थेट 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे आता सत्तासंघर्षाचा प्रश्न जास्तच चिघळत असल्याचे म्हटले जात आहे.

22 ऑगस्टला सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयात या सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांच्या खंडपीठीपुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 8 ऑगस्ट नंतर 12 ऑगस्टला पुढे ढकलण्यात आलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर आता 22 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.

पेच वाढणार?

मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही,रमण्णा यांच्या पदाचा कार्यकाळ 26 ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे या 22 ऑगस्ट रोजी होणा-या सुनावणीत यावर अंतिम निकाल न झाल्यास रमण्णा यांच्या निवृत्तीनंतर हे प्रकरण दुस-या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हा सत्तासंघर्षाचा पेच अजून क्लिष्ट होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here