राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात आज, मंगळवारीची सुनावणी तहकूब करण्यात आली असून पुढील सुनावणी शुक्रवार, २९ जुलै रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. मात्र तपास यंत्रणेला कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत म्हणून या प्रकरणात जामीन देण्यात यावा, असा दावा मलिकांच्या वतीने करण्यात आला होता. परंतु न्यायालयात ईडीने नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. आता मलिक यांच्या याचिकेवर विशेष पीएमएलए कोर्टात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
मागील पाच महिन्यांपासून ते तुरुंगातच आहेत. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या विरोधात पाच हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी मलिकांनी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोपी ईडीने केला आहे.
(हेही वाचा- Nude Photoshoot: ‘त्या’ आक्षेपार्ह फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर विरोधात FIR दाखल)
दरम्यान तपास यंत्रणेला आपल्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत, म्हणून या प्रकरणात जामीन देण्यात यावा, अशी याचिका मलिकांनी केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली. मात्र ईडीने मलिकांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.
Join Our WhatsApp Community